जेन गुडाल या एका सर्वसामान्य घरात वाढलेल्या तरुणीला एक जगावेगळे, पण खूप मोठे स्वप्न पडले होते; ते म्हणजे केनियात जाऊन चिंपांझींचा अभ्यास करण्याचे! औपचारिक संशोधन क्षेत्राचा अनुभव नाही, भाषा आणि संस्कृती यांच्या मर्यादा आणि स्त्रीत्वाचा शिक्का; या सर्वांवर मात करून आपल्या उराशी जपलेल्या या अवघड ध्येयाचा पाठलाग करणारी जेन ही नंतर अनेकांचा आदर्श झाली. मानवाच्याच नव्हे; तर सर्व जैवघटकांच्या प्राथमिक गरजा निसर्गच पूर्ण करत असतो. निसर्गातील विविध घटकांच्या अस्तित्वावर मानवी जीवन अवलंबून आहे. यांपैकी एका घटकाचेदेखील संतुलन बिघडले तर मानवजातीचे आयुष्यचं धोक्यात येऊ शकते. म्हणूनच सहकार्य आणि सहजीवन म�... See more
जेन गुडाल या एका सर्वसामान्य घरात वाढलेल्या तरुणीला एक जगावेगळे, पण खूप मोठे स्वप्न पडले होते; ते म्हणजे केनियात जाऊन चिंपांझींचा अभ्यास करण्याचे! औपचारिक संशोधन क्षेत्राचा अनुभव नाही, भाषा आणि संस्कृती यांच्या मर्यादा आणि स्त्रीत्वाचा शिक्का; या सर्वांवर मात करून आपल्या उराशी जपलेल्या या अवघड ध्येयाचा पाठलाग करणारी जेन ही नंतर अनेकांचा आदर्श झाली. मानवाच्याच नव्हे; तर सर्व जैवघटकांच्या प्राथमिक गरजा निसर्गच पूर्ण करत असतो. निसर्गातील विविध घटकांच्या अस्तित्वावर मानवी जीवन अवलंबून आहे. यांपैकी एका घटकाचेदेखील संतुलन बिघडले तर मानवजातीचे आयुष्यचं धोक्यात येऊ शकते. म्हणूनच सहकार्य आणि सहजीवन महत्त्वाचे ठरते. हेच जाणून जेनने चिंपांझींच्या संरक्षण, संवर्धन आणि संगोपन यांसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या अज्ञात आयुष्यावर तिने पहिल्यांदाच प्रकाश टाकला. जगभरच चिंपांझींबाबत तिने जागरूकता निर्माण केली. त्यासाठी संशोधन व अभ्यासकेंद्राची निर्मिती केली. आपली पृथ्वी सुंदर आहे आणि प्रत्येक प्रजातीसाठी ती तशीच असायला हवी, हेच या चरित्रातून व्यक्त होते. लेखकाविषयी : संजय कप्तान यांनी व्यवस्थापन व वाणिज्यविषयक, विज्ञान व तंत्रज्ञान, चरित्र असं विविध प्रकारचे लेखन केले आहे. मेरी क्युरी, लिओनार्दो, विज्ञानवेत्ता न्यूटन, व्यवस्थापन बोध, गुणवत्ता संस्कृती अशी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.