" कोणताही छोटा-मोठा उद्योग हा ’वित्तीय नियोजन, नियंत्रण व मोजमापा’शिवाय करताच येत नाही. यासाठी ’वित्त व्यवस्थापन’ नीटपणे माहीत असायला हवे.
वित्त व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्याकडे वित्तीय व्यवस्थापक किंवा सल्लागार असतो; परंतु उद्योगाचे ’मालक’ म्हणून त्याचे नफा - तोटा पत्रक (Profit & Loss Account) आणि ताळेबंद पत्रक (Balance Sheet) तुम्हाला ढोबळमानाने बनवता, वाचता आले पाहिजे. तुमच्या उद्योगाची ’वित्तीय स्थिती’ तुम्हाला वेळोवेळी तपासता आली पाहिजे. महत्त्वाच्या उद्योजकीय निर्णयांचा वित्तीय परिणाम काय होईल हेसुद्धा तुम्हाला मोजता यायला हवे. तुम्ही जे उत्पादन/वस्तू किंवा जी सेवा ठााहकाला देऊ इच्छिता त्यासाठीचा खर्च नीटपण�... See more
" कोणताही छोटा-मोठा उद्योग हा ’वित्तीय नियोजन, नियंत्रण व मोजमापा’शिवाय करताच येत नाही. यासाठी ’वित्त व्यवस्थापन’ नीटपणे माहीत असायला हवे.
वित्त व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्याकडे वित्तीय व्यवस्थापक किंवा सल्लागार असतो; परंतु उद्योगाचे ’मालक’ म्हणून त्याचे नफा - तोटा पत्रक (Profit & Loss Account) आणि ताळेबंद पत्रक (Balance Sheet) तुम्हाला ढोबळमानाने बनवता, वाचता आले पाहिजे. तुमच्या उद्योगाची ’वित्तीय स्थिती’ तुम्हाला वेळोवेळी तपासता आली पाहिजे. महत्त्वाच्या उद्योजकीय निर्णयांचा वित्तीय परिणाम काय होईल हेसुद्धा तुम्हाला मोजता यायला हवे. तुम्ही जे उत्पादन/वस्तू किंवा जी सेवा ठााहकाला देऊ इच्छिता त्यासाठीचा खर्च नीटपणे मोजता आला तरच तुम्ही त्या उत्पादनाच्या विक्रीची योग्य अशी किंमत ठरवू शकाल. या विक्रीच्या किमतीने तुम्हाला अपेक्षित असा ‘ROI' सुद्धा मिळावयास हवा. तुम्ही जेव्हा नव्या उद्योगात किंवा प्रकल्पात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला अशा गुंतवणुकीचे शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यमापन करता आले पाहिजे. वरील सर्व उद्देश लक्षात घेऊन मी या पुस्तकाचे अत्यंत सोप्या भाषेत लेखन केले आहे. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल व उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. - डॉ. गिरीश जाखोटिया डॉ. गिरीश जाखोटिया हे मराठीतील नामांकित लेखक आहेत. डॉ. जाखोटिया हे आंतरराठ्रीय व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. टाटा समूह, महिंद्रा समूह, गोदरेज, सिमेंस, एल अॅण्ड टी, ब्रिटिश पेट्रोलियम, ओमानची सेंट्रल बँक, बजाज ऑटो इ. साठहून अधिक नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे.