डॉ. गिरीश जाखोटिया हे मराठीतील नामांकित लेखक आहेत. त्यांना बारा साहित्यिक पुरस्कार मिळालेले असून त्यात शासनाचाही एक महत्त्वाचा पुरस्कार ‘डॉ. आंबेडकर आणि 21 वे शतक’ (मॅजेस्टिक प्रकाशन) या ग्रंथासाठीचा आहे. ललित, वैचारिक, काव्य, कादंबरी, लघुकथा, उद्योजकीय इ. विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
डॉ. जाखोटिया हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. एक उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. टाटा समूह, महिंद्रा समूह, गोदरेज, सिमेन्स, एल अॅण्ड टी, ब्रिटिश पेट्रोलियम, ओमानची सेंट्रल बँक, बजाज ऑटो इ. साठहून अधिक नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. भारत... See more
डॉ. गिरीश जाखोटिया हे मराठीतील नामांकित लेखक आहेत. त्यांना बारा साहित्यिक पुरस्कार मिळालेले असून त्यात शासनाचाही एक महत्त्वाचा पुरस्कार ‘डॉ. आंबेडकर आणि 21 वे शतक’ (मॅजेस्टिक प्रकाशन) या ग्रंथासाठीचा आहे. ललित, वैचारिक, काव्य, कादंबरी, लघुकथा, उद्योजकीय इ. विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
डॉ. जाखोटिया हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. एक उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. टाटा समूह, महिंद्रा समूह, गोदरेज, सिमेन्स, एल अॅण्ड टी, ब्रिटिश पेट्रोलियम, ओमानची सेंट्रल बँक, बजाज ऑटो इ. साठहून अधिक नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. भारतात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक सार्वजनिक व्याख्याने दिली आहेत. वित्त व व्यूहात्मक व्यवस्थापनावरील त्यांचे इंग्रजीतील ग्रंथ उद्योजकीय क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावावर काही महत्त्वाचे कॉपीराइट्स आहेत.
मुंबई ग्राहक पंचायत (पार्ले विभाग) चे ते अध्यक्ष आहेत. मुंबईच्या नामांकित जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेत ते प्राध्यापक होते. तिथे चार विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळाली. अखिल भारतीय सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार त्यांना असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स, दिल्लीतर्फे व उद्योजकीय विषयातील सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे मिळाला आहे. सध्या ते आणि त्यांची पत्नी मंजिरी जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स ही सल्लागार फर्म विलेपार्ले, मुंबई येथून चालवितात.
डॉ. जाखोटियांना बुद्धिबळ, गायन व तबला वादनात विशेष रस आहे.