तुमची आर्थिक प्रगती वेगाने करण्यासाठी स्टॉक्सचा वापर प्रभावीपणे करा.
भारतातले लोकप्रिय लेखक इंद्रजिथ शांथराज यांच्या ‘हाउ टू मेक मनी इन स्टॉक मार्केट ट्रेडिंग’ या पुस्तकातून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक कशी करायची आणि त्यावर प्रभुत्व कसे मिळवायचे याची उत्तम माहिती समजते. सोप्या भाषेत सांगायचे, तर या शेअर बाजारातल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचे, अमलात आणता येतील असे सल्ले या पुस्तकात दिलेले आहेत. त्याचबरोबर, आधी सर्व माहिती मिळवून मग ट्रेडिंगसंबंधी निर्णय घेण्यासाठी कोणती धोरणे उपयुक्त ठरतील, हेही या पुस्तकात सांगितलेले आहे.
बाजारातले ट्रेंड ओळखण्यापासून तांत्... See more

बाजारातले ट्रेंड ओळखण्यापासून तांत्रिक इंडिकेटरचे विश्लेषण करण्यापर्यंत या पुस्तकात यशस्वीपणे ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आणि तंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत.
प्रत्यक्ष उदाहरणे आणि त्यावरचे विश्लेषकांचे मत यात लिहिल्यामुळे, शेअर बाजाराच्या क्षणभरही उसंत नसलेल्या जगामध्ये वावरण्याची मानसिकता कशी विकसित करायची आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त कशी बाणवायची हेही या पुस्तकातून तुम्हाला समजेल. शिवाय, भांडवल कसे वाचवून ठेवायचे, त्याच त्या चुका परतपरत कशा करायच्या नाहीत आणि सतत शिकत राहणे कसे अनिवार्य आहे, हेही हे पुस्तक तुम्हाला दाखवून देईल.
तुम्ही नवशिके असाल किंवा अनुभवी ट्रेडर अथवा गुंतवणूकदार असाल तरीही तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी, तुमची आर्थिक स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला निश्चितच मदत होईल.
इंद्रजिथ शांथराज हे २०१६ पासून पूर्णवेळ इंट्राडे ऑप्शन्स ट्रेडर आणि गुंतवणूकदार आहेत. स्टॉक मार्केटसंबंधी अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अल्गॉरिदम ट्रेडिंग आणि स्वतःच्या विकसित केलेल्या पद्धती असे दोन्ही वापरून ते ट्रेडिंग करतात.त्यापूर्वी, बारा वर्षेमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.
तुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन : मूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ? RSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?
विचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ? हे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- 'प्राइस.' प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.
प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ? प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.