प्रभावी नेतृत्व कसं करायचं याचं मार्गदर्शक गाईड पीटर ड्रकर यांच्या 'द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह' या पुस्तकावरून प्रेरित झालेल्या या पुस्तकामध्ये लॉरा स्टँक यांनी २१ व्या शतकातील दोन महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे कार्यक्षमता आणि कार्यकुशलता. लॉरा असं म्हणतात की, जर तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी असामान्य योगदान द्यायचं असेल तर योग्य काम योग्य पद्धतीने करायला हवं. कार्यकुशलता म्हणजे योग्य पद्धतीने काम करणं आणि कार्यक्षमता म्हणजे जे योग्य काम आहे ते कमीत कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमीत कमी संसाधनांच्या मदतीने कमी खर्चात पूर्ण करणं. ड्रकर म्हणतात त्याप्रमाणे, जी गोष्ट करण्याची गरजच नव्हती त... See more
प्रभावी नेतृत्व कसं करायचं याचं मार्गदर्शक गाईड पीटर ड्रकर यांच्या 'द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह' या पुस्तकावरून प्रेरित झालेल्या या पुस्तकामध्ये लॉरा स्टँक यांनी २१ व्या शतकातील दोन महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे कार्यक्षमता आणि कार्यकुशलता. लॉरा असं म्हणतात की, जर तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी असामान्य योगदान द्यायचं असेल तर योग्य काम योग्य पद्धतीने करायला हवं. कार्यकुशलता म्हणजे योग्य पद्धतीने काम करणं आणि कार्यक्षमता म्हणजे जे योग्य काम आहे ते कमीत कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमीत कमी संसाधनांच्या मदतीने कमी खर्चात पूर्ण करणं. ड्रकर म्हणतात त्याप्रमाणे, जी गोष्ट करण्याची गरजच नव्हती ती जास्त चांगल्या कार्यक्षमतेने करणं म्हणजे वेळेचा सर्वात जास्त अपव्यय आहे. लॉरा स्टँक यांच्या ३ टी या संकल्पनेमध्ये त्यांनी १२ रणनीती सांगितल्या आहेत ज्यामुळे काम करणाऱ्यांना जास्त चांगल्या कार्यकुशलतेने आणि कार्यक्षमतेने त्यांचं काम पूर्ण करता येईल. कोणताही अधिकारी त्याचा वेळ ज्या तीन महत्त्वाच्या कामांसाठी देतो त्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे आणि ती तीन कामं म्हणजे धोरणात्मक विचारसरणी, संघभावनेतून काम आणि रणनीती. या तीन क्षेत्रांमधील त्यांच्या सूचना आणि कल्पनांच्या मदतीने तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणावर मदत होईल. २५ वर्षांहूनही जास्त अनुभव असलेल्या लॉरा स्टॅक यांनी माझ्या संघातील लोकांमध्ये कित्येक सकारात्मक बदल घडवून आणले. माझ्यासारख्या शेकडो लोकांना आणि संस्थांना त्यांनी मार्गदर्शन दिलं आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम आहेत. हे पुस्तक सर्वांनी वाचायलाच हवं असं मी सांगेन. - स्टीव्ह सिल्व्हर, मानव संसाधन संचालक, अलाइड बार्टन सुरक्षा सेवा.