मी अनेक वर्षे एका मनोविकासकाची भूमिका निभावली त्यामुळे मला लोकांना फार जवळून न्याहाळता आलं. या काळामध्ये मला असं जाणवलं की अनेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्रस्त आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि एकूणच त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा अभाव आहे. हा आनंदाचा अभाव त्यांच्यावर आव्हानांचे डोंगर कोसळले होते म्हणून नव्हता, तर त्यांना जीवनाचा खेळ खऱ्या अर्थाने खेळता येत नव्हता म्हणून होता. जीवनाचा हा खेळ जर बुद्धीनं खेळता आला तर जीवन कितीतरी पटीनं सुखमय, स्वस्त, समाधानी आणि आनंदी होऊ शकतं. माझ्या जीवनामध्ये मला हेच समजलं आणि म्हणुनच मी एक समाधानी, स्वस्थ, सुखमय आणि आनंदी जीवन जगू शकलो. नेमकं मला काय समजलं त�... See more
मी अनेक वर्षे एका मनोविकासकाची भूमिका निभावली त्यामुळे मला लोकांना फार जवळून न्याहाळता आलं. या काळामध्ये मला असं जाणवलं की अनेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्रस्त आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि एकूणच त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा अभाव आहे. हा आनंदाचा अभाव त्यांच्यावर आव्हानांचे डोंगर कोसळले होते म्हणून नव्हता, तर त्यांना जीवनाचा खेळ खऱ्या अर्थाने खेळता येत नव्हता म्हणून होता. जीवनाचा हा खेळ जर बुद्धीनं खेळता आला तर जीवन कितीतरी पटीनं सुखमय, स्वस्त, समाधानी आणि आनंदी होऊ शकतं. माझ्या जीवनामध्ये मला हेच समजलं आणि म्हणुनच मी एक समाधानी, स्वस्थ, सुखमय आणि आनंदी जीवन जगू शकलो. नेमकं मला काय समजलं ते मी या पुस्तकात मांडण्याचा प्रयन केला आहे. हे वाचून तुमच्याही जीवनामध्ये आनंदयोग घडून येऊ ही इच्छा