The Laws of Human Nature – Robert Greene (Marathi ) ‘लॉ’ज् ऑफ ह्युमन नेचर’ हे पुस्तक सभोवतालच्या लोकांच्या स्वभावाचा उलगडा करून घेण्यासाठीची नियमावली म्हणून वापरावे. सर्वसामान्य माणसे, विचित्र माणसे, विध्वंसक माणसे वगैरे संपूर्ण श्रेणी तुम्हाला त्यामध्ये सापडेल. ह्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण मानवी स्वभावाच्या एखाद्या विशिष्ट छटेविषयी भाष्य करते. आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रेरणेच्या अमलाखाली असतो तेव्हा तिच्या सापेक्षतेनुसार अंदाज लावण्याजोगे वर्तन आपल्याकडून घडते. त्याला ह्या विषयाची ‘नियमावली’ असे आपण म्हणू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये ह्या नियमांना अनुसरून आपण स्वत:वर आणि इतरांवरही कोणत्या युक्त्या वापरू शकतो, हे �... See more
The Laws of Human Nature – Robert Greene (Marathi ) ‘लॉ’ज् ऑफ ह्युमन नेचर’ हे पुस्तक सभोवतालच्या लोकांच्या स्वभावाचा उलगडा करून घेण्यासाठीची नियमावली म्हणून वापरावे. सर्वसामान्य माणसे, विचित्र माणसे, विध्वंसक माणसे वगैरे संपूर्ण श्रेणी तुम्हाला त्यामध्ये सापडेल. ह्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण मानवी स्वभावाच्या एखाद्या विशिष्ट छटेविषयी भाष्य करते. आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रेरणेच्या अमलाखाली असतो तेव्हा तिच्या सापेक्षतेनुसार अंदाज लावण्याजोगे वर्तन आपल्याकडून घडते. त्याला ह्या विषयाची ‘नियमावली’ असे आपण म्हणू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये ह्या नियमांना अनुसरून आपण स्वत:वर आणि इतरांवरही कोणत्या युक्त्या वापरू शकतो, हे सांगितले आहे. प्रत्येक प्रकरणाचा शेवट अशा वाक्याने केला आहे की, आपण ही मूळ मानवी प्रेरणा अधिक सकारात्मक आणि विधायकपणे कशी वापरू शकतो जेणेकरून आपण इथून पुढे मानवी स्वभावाचे गुलाम बनून राहणार नाही तर अधिक सक्रियपणे त्यामध्ये बदल घडवून आणू.