नवीन आवृत्तीची वैशिष्ट्ये - १. आयोगाच्या नव्या अभ्यासक्रमावर आधारित या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. २. दहाव्या आवृत्तीची रचना करताना आयोगाच्या आतापर्यंत झालेल्या परीक्षा व अभ्यासक्रम यांची योग्य सांगड घालून रचना करण्यात आली आहे. ३. या पुस्तकाची रचना राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या इतिहास या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमवार आधारित असली तरी त्याद्वारे तसाच अभ्यासक्रम असलेल्या UPSC परीक्षेचा अभ्यास करताना देखील या पुस्तकाची मदत होणार आहे. ४. UPSC, MPSC राज्यसेवा यांसोबतच संयुक्त परीक्षा गट 'ब' व गट 'क' यांच्या पूर्व व मुख्य परीक्षांचा अभ्यास करताना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. ५. UPSC व MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या �... See more
नवीन आवृत्तीची वैशिष्ट्ये - १. आयोगाच्या नव्या अभ्यासक्रमावर आधारित या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. २. दहाव्या आवृत्तीची रचना करताना आयोगाच्या आतापर्यंत झालेल्या परीक्षा व अभ्यासक्रम यांची योग्य सांगड घालून रचना करण्यात आली आहे. ३. या पुस्तकाची रचना राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या इतिहास या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमवार आधारित असली तरी त्याद्वारे तसाच अभ्यासक्रम असलेल्या UPSC परीक्षेचा अभ्यास करताना देखील या पुस्तकाची मदत होणार आहे. ४. UPSC, MPSC राज्यसेवा यांसोबतच संयुक्त परीक्षा गट 'ब' व गट 'क' यांच्या पूर्व व मुख्य परीक्षांचा अभ्यास करताना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. ५. UPSC व MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांव्यातिरिक्त इतर सर्व सरळ सेवा परीक्षा, जिल्हास्तरीय परीक्षा वा तत्सम सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. ६. आधुनिक भारत यातील सर्व उपघटकांसोबतच स्वातंत्र्योत्तर भारतातील उपघटकांचा समावेश देखील या पुस्तकात करण्यात आलेला आहे. ७. नवीन आवृत्तीत आवश्यक तिथे चार्ट, ग्राफ व बॉक्स यांचा वापर करून पुस्तकाची सदर आवृत्ती अद्यावत, लक्षवेधक व परीक्षाभिमुख करण्यात आलेली आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 'आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास' या पुस्तकाची नवीन आवृत्ती आपल्या हाती देत आहे. आता या आवृत्तीपासून आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व आधुनिक भारताचा इतिहास अशी दोन पुस्तके आपल्याला मिळतील. यामुळे पुस्तकाची रचना सुटसुटीत झाली आहे. ज्यांना केवळ महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे त्यांच्यासाठी हे स्वतंत्र पुस्तक आहे. 'आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास' या पुस्तकात महाराष्ट्रातील इतिहासाची कालानुक्रमे मांडणी केलेली आहे. त्यासाठी तितकेच दर्जेदार ग्रंथ व संदर्भ पुस्तकांचा आधार घेण्यात आलेला आहे. हे करताना कुठेही क्लिष्टता व जडपणा येऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. सदर पुस्तकाची रचना विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मदत व्हावी अशी केली आहे. या पुस्तकात महाराष्ट्रातील समाजसुधारकांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबतच आधुनिक काळातील महत्वाच्या व्यक्तींची देखील माहिती यात देण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने परत वेगळे पुस्तक वाचण्याची तसदी आपणास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. मला खात्री आहे की, 'आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास' या पुस्तकात आपल्याला परीक्षाभिमुख दर्जेदार माहिती नक्कीच मिळेल. सदर पुस्तक सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. पुस्तकाबद्दल आपल्या काही सूचना व सुधारणा असल्यास नक्की कळवा.