छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग... See more
छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन् अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.
शिवरायांची व्यूहनीती यशस्वी ठरली ती त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यामुळे. आपल्या अजोड व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रूंना नामोहरम केले व स्वराज्याची घडी उत्तम बसविली. उत्तम व्यवस्थापनामध्ये व्यूहरचना व व्यवस्थापन यांचा परस्परांतील मेळ, प्रसंगनिष्ठ चतुराई, साहाय्यक संघ, प्रकल्पाची पूर्वतयारी, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तडीस नेण्यात येणारी कामे, किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे शिवरायांनी दाखवून दिले. स्वतःजवळ कुठलीही पुरेशी साधनसामग्री नसताना, बाकीचे मराठा सरदार परकीयांसमोर नतमस्तक होत असताना नि सारा समाज संभ्रमित-गलितगात्र झालेला असताना शिवाजी महाराजांनी जे ‘कल्पक धाडस' केले, त्या धाडसाच्या व्यूहरचना-प्रक्रिया आजच्या तरुणांना कळल्या पाहिजेत.
आजच्या 'कॉर्पोरेट जगता'चे नेतृत्व सुजाण तरुणांनी करावयाचे असेल, तर छत्रपतींच्या अनेक व्यूहनीतींचा साकल्याने विचार व अंगीकार करावा लागेल.
या पुस्तकात खालील मुद्द्यांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे.
शिवरायांचे-
• नियोजन आणि व्यवस्थापन
• नेतृत्व आणि कार्यपद्धती
• अर्थशास्त्र आणि अर्थकारण
• दूरदृष्टिता आणि विचारसरणी
• आधुनिक धार्मिकता व कर्मयोग
• उत्तम चारित्र्याची कल्पना