२६ /११ कसाब आणि मी - २६/११. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला. शेकडो मृत -जखमी. दहांपैकी फक्त एक अतिरेकी जिवंत. अजमल आमिर कसाब. कसाब पाकिस्तानचा. हल्ला पाकिस्तानपुरस्कृत.कटाची पाळंमुळं देशविदेशांत रुजलेली. षड्यंत्राचे हे पुरावे शोधणं, उलगडणं ,जोडणं - महाकाय काम ! आपल्या तपास यंत्रणांनी ते पेललं. समर्थपणे.आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली या निःपक्षपाती खटल्याची वाखाणणी कालकूपीत जाऊन बसलेल्या, इतिहासाच्या काळ्याकुळकुळीत तपासाचा हा साद्यंत, सचित्र वृत्तांत. प्रथमपुरुषी, एकवचनी... रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा - ही आहे 'रॉ' ची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशी�... See more
२६ /११ कसाब आणि मी - २६/११. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला. शेकडो मृत -जखमी. दहांपैकी फक्त एक अतिरेकी जिवंत. अजमल आमिर कसाब. कसाब पाकिस्तानचा. हल्ला पाकिस्तानपुरस्कृत.कटाची पाळंमुळं देशविदेशांत रुजलेली. षड्यंत्राचे हे पुरावे शोधणं, उलगडणं ,जोडणं - महाकाय काम ! आपल्या तपास यंत्रणांनी ते पेललं. समर्थपणे.आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली या निःपक्षपाती खटल्याची वाखाणणी कालकूपीत जाऊन बसलेल्या, इतिहासाच्या काळ्याकुळकुळीत तपासाचा हा साद्यंत, सचित्र वृत्तांत. प्रथमपुरुषी, एकवचनी... रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा - ही आहे 'रॉ' ची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची...रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरून चालत असते ते. त्या प्रतलांचा वेध घेत, त्यास वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तेथे नैतिक-अनैतिकतेचे निकष फोल असतात. तेथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात , हेरांनी यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणांस दर्शन घडवतात गेल्या पन्नास-साठ-सत्तर वर्षांत आपण काय केले असे न्यूनगंड निर्माण करणारे सवाल केले जात असताना, रॉचा हा पडद्याआडचा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे. एका सशक्त सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे