ऐतिहासिक सत्य समोर आणणारी एखादी कलाकृती लोकप्रिय होऊ लागली की, काही लोकांचा पोटशूळ उठलाच म्हणून समजा.इतिहासातल्या एका महत्वाच्या घटनेची 'दुसरी बाजू' मांडणारी एक दर्जेदार नाट्यकृती म्हणजेच.. 'मी नथुराम गोडसे बोलतोय....!' नाटकाच्या माध्यमातून 'नथुराम' रंगमंचावर आला, आणि गदारोळ सुरु झाला...!नथुरामच्या भूमिकेत होते अभिनेते शरद पोंक्षे..! स्वतःला बापूंचे पक्के अनुयायी म्हणवणाऱ्यांनी हाणामारी, तोडफोड, जाळपोळ करून अक्षरशः धुमाकूळ घातला....पण..या सगळ्यात खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले, शरद पोंक्षे ! ते लढले, त्यांना बरचं काही सोसावं लागलं.. त्यांना हा संघर्ष कधी न्यायलयासोबत, कधी राजकीय पक्षांसोबत, तर कधी जवळच्या लो... See more
ऐतिहासिक सत्य समोर आणणारी एखादी कलाकृती लोकप्रिय होऊ लागली की, काही लोकांचा पोटशूळ उठलाच म्हणून समजा.इतिहासातल्या एका महत्वाच्या घटनेची 'दुसरी बाजू' मांडणारी एक दर्जेदार नाट्यकृती म्हणजेच.. 'मी नथुराम गोडसे बोलतोय....!' नाटकाच्या माध्यमातून 'नथुराम' रंगमंचावर आला, आणि गदारोळ सुरु झाला...!नथुरामच्या भूमिकेत होते अभिनेते शरद पोंक्षे..! स्वतःला बापूंचे पक्के अनुयायी म्हणवणाऱ्यांनी हाणामारी, तोडफोड, जाळपोळ करून अक्षरशः धुमाकूळ घातला....पण..या सगळ्यात खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले, शरद पोंक्षे ! ते लढले, त्यांना बरचं काही सोसावं लागलं.. त्यांना हा संघर्ष कधी न्यायलयासोबत, कधी राजकीय पक्षांसोबत, तर कधी जवळच्या लोकांसोबतही करावा लागला... गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने आपले विचार निर्भीडपणे मांडणाऱ्या एका मनस्वी कलावंताचं हे अनुभवकथन..... मी आणि नथुराम !