Sadand Deshmukhबारोमास ही एक महान शोकांतिका आहे. उत्कट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. मात्र पात्रांच्या शोकात्मक जीवनाची ही कहाणी एखाद्या व्यक्तीच्या दोषातून निर्माण झालेली नाही, ती संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेच्या आंतर्विरोधाची; राजकीय शक्तीच्या उपेक्षेतून भ्रष्टाचारी आत्मकेंद्रिततेतून; सांस्कृतिक हासाच्या प्रक्रियेतून उद्भवलेली करुण कथा आहे. म्हणूनच ती अधिक मूल्यवानही आहे. भारतीय शेतकऱ्याचं सर्वांगीण चित्र एकनाथ आणि त्याच्या कुटुंबाच्या आधारे लेखकाने केले आहे. लेखक शेतीचं; वेगवेगळ्या पिकांचं, शेती संबंधित सर्व बाबींचं जे विराट चित्र उभं करतो त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाचं, विलक्षण नि... See more
Sadand Deshmukhबारोमास ही एक महान शोकांतिका आहे. उत्कट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. मात्र पात्रांच्या शोकात्मक जीवनाची ही कहाणी एखाद्या व्यक्तीच्या दोषातून निर्माण झालेली नाही, ती संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेच्या आंतर्विरोधाची; राजकीय शक्तीच्या उपेक्षेतून भ्रष्टाचारी आत्मकेंद्रिततेतून; सांस्कृतिक हासाच्या प्रक्रियेतून उद्भवलेली करुण कथा आहे. म्हणूनच ती अधिक मूल्यवानही आहे. भारतीय शेतकऱ्याचं सर्वांगीण चित्र एकनाथ आणि त्याच्या कुटुंबाच्या आधारे लेखकाने केले आहे. लेखक शेतीचं; वेगवेगळ्या पिकांचं, शेती संबंधित सर्व बाबींचं जे विराट चित्र उभं करतो त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाचं, विलक्षण निरिक्षण शक्तीचं, भाषेवरील प्रभुत्वाचं द्योतक आहे. ही कादंबरी वाचताना जाणवतं, मराठी ग्रामीण साहित्य सर्व स्तरावरच्या भावूक, कृतक मोहबंधनातून बाहेर येऊन विदारक, भयावह वास्तवाचं दर्शन घडवीत आहे. सदानंद देशमुख जितक्या सामर्थ्याने बाह्य वास्तवाच्या प्रतिकूलतेचं चित्रण करतात तितक्याच ताकदीने माणसाच्या अंतर्मनाचाही वेध घेतात. ही ताकद टॉलस्टॉयसारख्या लेखकात आढळते. त्या वाटेवर देशमुख चालले आहेत. माझ्या अल्पमतीप्रमाणे इतकं सर्वंकष ग्रामीण जीवनदर्शन कुठल्याही एका कृतीतून मराठीत झालेलं नाही. ही एका कृषिव्यवस्थेत, संस्कृतीत वाढलेल्या प्रतिभाशाली लेखकाने लिहिलेली थोर कृती आहे. मी वाचलेल्या प्रेमचंदांच्या 'गोदान' आणि फणीश्वरनाथ रेणू यांच्या 'मैला आँचल' या महान कृतींच्या मालिकेत मानाने बसणारी ! डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर मिहाना पब्लिकेशन्स