शंतनू नायडू हा विशीतला तरुण, 2014 साली, ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करू लागला. वेगाने धावणार्या गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणार्या स्थानिक भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. स्वतः रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने त्यांनी शंतनूच्या कृत्याची दखल घेतली. त्याने प्रभावित होऊन त्यांनी शंतनूच्या या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच; पण कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुद्धा झाले. ‘रतन टाटा एक दीपस्तंभ’ ही एक अतिशय प्रामाणिक आणि मनःपूर्वक सांगितलेली भावकथा आहे. एकविसाव्या शतकातला तरुण आणि ऐंशीच्या दशकातला तपस्�... See more
शंतनू नायडू हा विशीतला तरुण, 2014 साली, ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करू लागला. वेगाने धावणार्या गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणार्या स्थानिक भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. स्वतः रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने त्यांनी शंतनूच्या कृत्याची दखल घेतली. त्याने प्रभावित होऊन त्यांनी शंतनूच्या या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच; पण कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुद्धा झाले. ‘रतन टाटा एक दीपस्तंभ’ ही एक अतिशय प्रामाणिक आणि मनःपूर्वक सांगितलेली भावकथा आहे. एकविसाव्या शतकातला तरुण आणि ऐंशीच्या दशकातला तपस्वी यांच्यातल्या अनोख्या नात्याची चुणूक आपल्यासमोर येते आणि त्यातूनच भारताचा लाडका मेरूमणी आपल्यासमोर वेगळ्याच प्रकाशात झळकतो.