कृष्णराव अर्जुन केळूसकर वाङ्मयमहर्षी कृ. अ. केळूसकर गेल्या शतकातील महान चरित्रकार आहेत. राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखनाची प्रशंसा केली. केळूसकर धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान या गहन विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते; बहुजन समाजाच्या या वाङ्मयमहर्षीची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. संत तुकाराम महाराज, गौतमबुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषांचे ते मराठीतले पहिले महान चरित्रकार आहेत. त्यांनी पस्तीस चरित्र लिहिली. ते म. फुले यांची सत्यशोधक चळवळ, मराठा ऐक्येच्छू सभेचे कार्यकर्ते आणि जनात जनार्द... See more
कृष्णराव अर्जुन केळूसकर वाङ्मयमहर्षी कृ. अ. केळूसकर गेल्या शतकातील महान चरित्रकार आहेत. राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखनाची प्रशंसा केली. केळूसकर धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान या गहन विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते; बहुजन समाजाच्या या वाङ्मयमहर्षीची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. संत तुकाराम महाराज, गौतमबुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषांचे ते मराठीतले पहिले महान चरित्रकार आहेत. त्यांनी पस्तीस चरित्र लिहिली. ते म. फुले यांची सत्यशोधक चळवळ, मराठा ऐक्येच्छू सभेचे कार्यकर्ते आणि जनात जनार्दन पाहणारे ऋषितुल्य प्रज्ञावंत होते.