'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि मृत्यू 'स्वराज्या'चे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा प्रवास... 'अपराजित योद्धा', 'मृत्युंजय' अशी ऐतिहासिक प्रतिमा असलेल्या शंभूराजांना उणेपुराणे ३२ वर्षांचे आयुष्य लाभले... इतिहासाने संभाजीराजांवर अन्याय केला... परंतु शंभूराजांनी मराठा योद्ध्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग पेटत ठेवले, हे नाकारता येणार नाही. ...संभाजीराजांच्या या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्क... See more
'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि मृत्यू 'स्वराज्या'चे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा प्रवास... 'अपराजित योद्धा', 'मृत्युंजय' अशी ऐतिहासिक प्रतिमा असलेल्या शंभूराजांना उणेपुराणे ३२ वर्षांचे आयुष्य लाभले... इतिहासाने संभाजीराजांवर अन्याय केला... परंतु शंभूराजांनी मराठा योद्ध्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग पेटत ठेवले, हे नाकारता येणार नाही. ...संभाजीराजांच्या या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्कालीन ऐतिहासिक, राजकीय संदर्भ मांडणारी कादंबरी! लेखकाविषयी माहिती : लेखिका मेधा देशमुख-भास्करन या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारत, जर्मनी व युनायटेड अरब एमिरेट्समधील अन्न व औषध कंपन्यांच्या व्यापार व विक्री विभागात काम केलेले आहे. भारत व गल्फमधील प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासंबंधी विपुल लेखन केले आहे. मेधा देशमुख यांचे छत्रपती शिवाजीमहाराजांचे चरित्र असलेले ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’ हे पहिले इंग्रजी पुस्तक आहे. या पुस्तकाला 'रेमंड क्रॉसवर्ड बुक'तर्फे चरित्र लेखनासाठी असलेले मानांकन मिळाले होते. या पुस्तकाचे झुंज नियतीशी’ (मराठी) व ‘नियतीको चुनौती’ (हिंदी) अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. 'फ्राँटियर्स' या 'पहिल्या कादंबरीचा ‘रणसंग्राम’ हा अनुवादही प्रकाशित झाला आहे. ‘प्रिस्किप्श्न ऑफ लाईफ’ हे औषध निर्मिती व वैद्यकशास्त्रावरील पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्याचबरोबर ‘अप अगेन्ट डार्कनेस’ या त्यांच्या पुस्तकाचा अनुवादही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.