पॅरिस मधील Bibliothèque Nationale De France (BnF) येथील Manuscripts Department मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही बखर आहे. ही बखर साधारणपणे १७५० सालच्या आसपास लिहिली गेली असावी व ती आज प्रसिद्ध असणाऱ्या सर्व ९१ कलमी बखरींची पूर्वसूरी असावी. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे. महाराज व सईबाई यांच्यातील संवाद, बोरीची काठी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती, अफझलखान मारला त्यावेळी कोण लोक हजर होते, विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटी असे अनेक बारीक तपशील बखरीत आहेत. संभाजी महाराज रायगडी आले त्यावेळी तिथे असलेले सामान त्यांनी ताब्यात घेतले, त्याच�... See more
पॅरिस मधील Bibliothèque Nationale De France (BnF) येथील Manuscripts Department मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही बखर आहे. ही बखर साधारणपणे १७५० सालच्या आसपास लिहिली गेली असावी व ती आज प्रसिद्ध असणाऱ्या सर्व ९१ कलमी बखरींची पूर्वसूरी असावी. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे. महाराज व सईबाई यांच्यातील संवाद, बोरीची काठी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती, अफझलखान मारला त्यावेळी कोण लोक हजर होते, विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटी असे अनेक बारीक तपशील बखरीत आहेत. संभाजी महाराज रायगडी आले त्यावेळी तिथे असलेले सामान त्यांनी ताब्यात घेतले, त्याची यादीही बखरकाराने दिली आहे.