पशुपालन हा शेतीइतकाच प्राचीन उद्योग आहे. आधुनिक काळात मात्र वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत गेला. वाढत्या मनुष्यसंख्येची गरज भागवायला लागणारे वाढते पशुधन जोपासण्यासाठी आवश्यक पौष्टिक चारा उपलब्ध होणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी चाऱ्यासाठी गवतांसोबतच झाडेझुडपे लावणे हा एक महत्त्वाचा आणि फायदेशीर पूरक उद्योग आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणारे पुस्तक : चाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडाझुडपांचा सविस्तर परिचय लागणारी जमीन, हवामान, लागवड, पीक वाढीचा कालावधी, कापणी, साठवण अशी सर्वांगीण माहिती पाऊसपाण्याच्या प्रमाणानुसार कोणत�... See more
पशुपालन हा शेतीइतकाच प्राचीन उद्योग आहे. आधुनिक काळात मात्र वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत गेला. वाढत्या मनुष्यसंख्येची गरज भागवायला लागणारे वाढते पशुधन जोपासण्यासाठी आवश्यक पौष्टिक चारा उपलब्ध होणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी चाऱ्यासाठी गवतांसोबतच झाडेझुडपे लावणे हा एक महत्त्वाचा आणि फायदेशीर पूरक उद्योग आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणारे पुस्तक : चाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडाझुडपांचा सविस्तर परिचय लागणारी जमीन, हवामान, लागवड, पीक वाढीचा कालावधी, कापणी, साठवण अशी सर्वांगीण माहिती पाऊसपाण्याच्या प्रमाणानुसार कोणती झाडे लावावी याविषयी मार्गदर्शन ओल्या आणि कोरड्या चाऱ्यातील विविध पौष्टिक गुणांची शास्त्रीय माहिती झाडाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग चारा किंवा मूरघास बनवण्यासाठी कसा करावा याविषयी सूचना या झाडाझुडपांची लागवड कमी आकाराची / उंचसखल / तुकड्यातुकड्यांची जमीन वापरूनही करता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक झाडेझुडपे लावा पशुधन जगवा लेखकाविषयी : कृष्णाजी महादेव कोकाटे बी.एस्सी. (कृषी) कृषी महाविद्यालय, पुणे २००५मध्ये बाएफ संस्थेतून अतिरिक्त कार्यक्रम संचालक म्हणून सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी, विभागीय संशोधन केंद्र , बाएफ, अखिल भारतीय चारा संशोधन केंद्र, नवी दिल्ली अभ्यास मार्गदर्शक, विभागीय अभ्यास केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सध्या कृषिविषयक पुस्तकलेखनात व्यग्र