वाचकांचा कुतूहलाचा आणि आवडीचा विषय निळावंती... एक अशी यक्षिणी जी एक शाप घेऊन भूतलावर मनुष्य रूपात जन्माला आली होती. तिचे निळे डोळे, चाफेकळी नाक, मोत्यासारखे दात, लोभस हास्य, सोनेरी रंग, आकर्षक बांधा, म्हणजेच मूर्तिमंत सौंदर्य. अर्थात, ती एक यक्षिणी असल्यामुळे सौंदर्य तिच्या ठायी ठायी भरले होते. तिच्या शापमुक्तीसाठी तिला एक विशेष वरदान देण्यात आले होते. तिला जगातील सर्वपशू-पक्षांची भाषा, एकुणातच सर्व सजीवांची भाषा अवगत होती. ती त्यांच्याशी त्यांच्यात्यांच्या भाषेत संवाद साधू शकत होती. याच निळावंतीची रहस्यमय कथा नवीन रूपात, आजच्या काळाच्या परिघात बसणारी, तितकीच रहस्यमय आणि थरारक! चला तर मग तयार होऊया नी�... See more
वाचकांचा कुतूहलाचा आणि आवडीचा विषय निळावंती... एक अशी यक्षिणी जी एक शाप घेऊन भूतलावर मनुष्य रूपात जन्माला आली होती. तिचे निळे डोळे, चाफेकळी नाक, मोत्यासारखे दात, लोभस हास्य, सोनेरी रंग, आकर्षक बांधा, म्हणजेच मूर्तिमंत सौंदर्य. अर्थात, ती एक यक्षिणी असल्यामुळे सौंदर्य तिच्या ठायी ठायी भरले होते. तिच्या शापमुक्तीसाठी तिला एक विशेष वरदान देण्यात आले होते. तिला जगातील सर्वपशू-पक्षांची भाषा, एकुणातच सर्व सजीवांची भाषा अवगत होती. ती त्यांच्याशी त्यांच्यात्यांच्या भाषेत संवाद साधू शकत होती. याच निळावंतीची रहस्यमय कथा नवीन रूपात, आजच्या काळाच्या परिघात बसणारी, तितकीच रहस्यमय आणि थरारक! चला तर मग तयार होऊया नीला नावाच्या रहस्यमयी प्रवासासाठी...‘शापीत यक्षिणी - निळावंती’