मी तत्त्वतः कोण आहे याचा शोध घेणं हे अध्यात्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपण जेव्हा स्वतःला 'मी' म्हणतो तेव्हा आपल्याला आपले व्यक्तित्व अर्थात आपले नाव, गाव, जात, धर्म, स्वभाव, हुद्दा, इ. अभिप्रेत असतं आणि व्यावहारिक स्तरावर ते बरोबर देखील आहे. पण हाच प्रश्न जेव्हा आपण अध्यात्माच्या स्तरावरून विचारतो तेव्हा त्याला तो आपल्या स्वतःशी अभिप्रेत नसतो तर तो आपल्या स्वतःच्या गाभ्याशी जे आत्मिक तत्त्व आहे त्याच्याशी असतो... आणि त्या तत्त्वाविषयी जागरुक होणं है अध्यात्माचं प्रयोजन आहे. जी व्यक्ती या तत्त्वाविषयी जागरुक होते तीचं जीवन अंतबह्यि विकसित होऊन जातं. या तत्त्वाविषयी वाचकाला जागरुक करणं हाच या पुस्तकाच... See more
मी तत्त्वतः कोण आहे याचा शोध घेणं हे अध्यात्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपण जेव्हा स्वतःला 'मी' म्हणतो तेव्हा आपल्याला आपले व्यक्तित्व अर्थात आपले नाव, गाव, जात, धर्म, स्वभाव, हुद्दा, इ. अभिप्रेत असतं आणि व्यावहारिक स्तरावर ते बरोबर देखील आहे. पण हाच प्रश्न जेव्हा आपण अध्यात्माच्या स्तरावरून विचारतो तेव्हा त्याला तो आपल्या स्वतःशी अभिप्रेत नसतो तर तो आपल्या स्वतःच्या गाभ्याशी जे आत्मिक तत्त्व आहे त्याच्याशी असतो... आणि त्या तत्त्वाविषयी जागरुक होणं है अध्यात्माचं प्रयोजन आहे. जी व्यक्ती या तत्त्वाविषयी जागरुक होते तीचं जीवन अंतबह्यि विकसित होऊन जातं. या तत्त्वाविषयी वाचकाला जागरुक करणं हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक वाचकाला अलगदपणे त्याच्या आत्मिक गाभ्यापर्यंत घेऊन जाईल आणि.... 'कोऽहम' म्हणजे 'मी कोण आहे' पासून ते "सोहम" म्हणजे "मी ते आत्मिक तत्व आहे याचं दर्शन घडवेल आणि असं जर होऊ शकलं तर त्याला सर्वार्थानं जीवनमुक्त होण्याची अनुभती लाभेल.