ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल. अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारतीय स्टॉक मार्केट या �... See more
ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल. अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात. हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे.
कौशिक क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगतात. हे पुस्तकदेखील त्यांनी एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही. एक सामान्य वेटर असलेला घिसूभाई या गोष्टीचा नायक आहे. प्रस्तुत पुस्तकात कौशिक घिसूभाईला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकवतात याचे उत्तम सादरीकरण केलेले आहे.
विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.