अर्वाचीन मराठी साहित्याचा चिकित्सक आढावा रा. श्री. जोग, श्री. ना. बनहट्टी, वि. स. खांडेकर, म. ना. अदवंत, वि. ह. कुलकर्णी, भालचंद्र फडके, अ. म. जोशी, व. दि. कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी प्रदक्षिणा खंड पहिला प्रदक्षिणा : खंड १ मराठी साहित्याची इंद्रायणी सतत वाहते आहे. नव्या नव्या आविष्कारांचे ओघ तिला येऊन मिळत आहेत. ताज्या दमाचे लेखक उमेदीने लिखाण करीत आहेत. जुन्या-नव्याचा संघर्ष तर सनातन आहे. आजचे नवे हे उद्याचे जुने आहे. किंबहुना या संघर्षाच्या तीरांमधूनच साहित्याचे पात्र पुढे सरकत आहे. अशा वेळी प्रवास किती झाला, प्रगती किती झाली हे मधूनच अजमावून पाहण्यासाठी सिंहावलोकन करावे लागते. शिल्लक किती राहिले आणि दिसेनासे कि... See more
अर्वाचीन मराठी साहित्याचा चिकित्सक आढावा रा. श्री. जोग, श्री. ना. बनहट्टी, वि. स. खांडेकर, म. ना. अदवंत, वि. ह. कुलकर्णी, भालचंद्र फडके, अ. म. जोशी, व. दि. कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी प्रदक्षिणा खंड पहिला प्रदक्षिणा : खंड १ मराठी साहित्याची इंद्रायणी सतत वाहते आहे. नव्या नव्या आविष्कारांचे ओघ तिला येऊन मिळत आहेत. ताज्या दमाचे लेखक उमेदीने लिखाण करीत आहेत. जुन्या-नव्याचा संघर्ष तर सनातन आहे. आजचे नवे हे उद्याचे जुने आहे. किंबहुना या संघर्षाच्या तीरांमधूनच साहित्याचे पात्र पुढे सरकत आहे. अशा वेळी प्रवास किती झाला, प्रगती किती झाली हे मधूनच अजमावून पाहण्यासाठी सिंहावलोकन करावे लागते. शिल्लक किती राहिले आणि दिसेनासे किती झाले याची वजाबाकी तपासावी लागते. नव्या काचांमधून जुनी लहानमोठी माणसे, त्यांचे साहित्य न्याहाळावे लागते. गडद रंग निवळलेले असतात. अशा वेळी गतकालीन साहित्याचा आढावा घेणाऱ्या ग्रंथांची आवश्यकता भासू लागते. "प्रदक्षिणा" हा आवश्यकतेतून निर्माण झालेला ग्रंथ आहे. प्रबोधन काल आणि स्वातंत्र्य आंदोलन-पर्व यांच्या पार्श्वभूमीवर सिध्द झालेल्या अर्वाचीन साहित्याचा धावता पण नीटस आढावा ह्यात आलेला आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकास आणि चोखंदळ वाचकास 'प्रदक्षिणे' ची ही आवृत्ती निश्चितच संग्राह्य वाटेल.