या पुस्तकात आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यान आलेल्या रोमांचक आणि चित्तथरारक अनुभवांचे अतिशय रंजकपद्धतीने वर्णन करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या वन्यपशूनी समृद्ध असणाऱ्या प्रदेशातील हे चित्तथरारक प्रसंग आहेत. सिंह, बिबटे, चित्ते, हत्ती, रानगवे नि अजगर या शेजारीमंडळींसोबत मरेरे जंगलात राहणारे डॉस्टन दाम्पत्य, त्यांच्या जीवनात आलेल्या 'अजगराचा दिवस', 'बिबट्याची संध्याकाळ', 'हत्तीची रात्र', 'सिंहाचे प्रभातदर्शन' यासारख्या चित्रविचित्र प्रसंगांशी कशी झुंज देतात याचे प्रसंगचित्रण 'आफ्रिकेतील थरार दिवस... थरार रात्री!' या कथेतून वाचावयास मिळते. आफ्रिकेत घडलेली अनेक थरारनाट्येही यामध्ये आहेत.
वाचकांना क्ष�... See more

वाचकांना क्षणभर स्तब्ध करणारे व उत्कंठा शिगेला पोहोचविणारे थरारक प्रसंग या कथासंग्रहात आलेले आहेत.
प्रसंगाचे रोमांचकारी, चित्तथरारक असे हुबेहूब वर्णन करत वाचकास अंतर्मुख करणे हे विजय देवधरांच्या लेखनाचे मूलभूत वैशिष्ट्य या कथासंग्रहातही अनुभवण्यास मिळते.