प्रकाशवाटा' या पुस्तकात आमच्या पिढीने भामरागडच्या जंगलात अंधाराकडून प्रकाशाकडे कशी वाटचाल केली याची गोष्ट मी सांगितली होती. 'नवी पिढी, नव्या वाटा'मध्ये गोष्ट आहे त्यानंतरच्या भरारीची. आदिवासींना सजग, सक्षम आणि सुदृढ बनवण्याचं बाबा आमटेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उचललेल्या पुढच्या पावलांची. दिगंत-अनघा, अनिकेत - समीक्षा यांनी सोबतीला नवे कार्यकर्ते घेऊन हेमलकशातल्या 'लोकबिरादरी' प्रकल्पाचं काम वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. या सर्वांना एकदिलाने काम करताना बघून आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचं मन समाधानाने भरून येतं. प्रकल्पाच्या भवितव्याची आता तीळमात्रही काळजी नाही. - डॉ. प्रकाश आमटे