स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासाचा निर्णय होणे, त्यासाठी पुण्यात येणे, जी चाणक्य मंडलमध्ये प्रवेश घेणे, पुढे परीक्षेतील सर्व चढ-उतार पाहून भारतीय पोलिस टोवेसाठी (()) माझी निवड होणे आणि आता नीतिशास्त्रावर मराठीतून हे पुस्तक माझ्याकडून लिहिले जाणे हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय व काही प्रमाणात आश्चर्यकारकही आहे. इंग्रजी कच्चे असल्याने या प्रम असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा मराठीतूनच देणार हा माझा हट्ट होता, जो मी पूर्ण केला. मात्र हे करताना येणाऱ्या असंख्य अडचणी मला जाणवल्या त्यात आयोगाल दिलेल्या अभ्यासक्रमानुसार महाठीतून अभ्याससाहित्य उपलब्ध नसणे ही सर्वात मोठी अडचण होती. त्य�... See more
स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासाचा निर्णय होणे, त्यासाठी पुण्यात येणे, जी चाणक्य मंडलमध्ये प्रवेश घेणे, पुढे परीक्षेतील सर्व चढ-उतार पाहून भारतीय पोलिस टोवेसाठी (()) माझी निवड होणे आणि आता नीतिशास्त्रावर मराठीतून हे पुस्तक माझ्याकडून लिहिले जाणे हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय व काही प्रमाणात आश्चर्यकारकही आहे. इंग्रजी कच्चे असल्याने या प्रम असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा मराठीतूनच देणार हा माझा हट्ट होता, जो मी पूर्ण केला. मात्र हे करताना येणाऱ्या असंख्य अडचणी मला जाणवल्या त्यात आयोगाल दिलेल्या अभ्यासक्रमानुसार महाठीतून अभ्याससाहित्य उपलब्ध नसणे ही सर्वात मोठी अडचण होती. त्यामुळे यूपीएससीचा अभ्यास करताना इंग्रजी साहित्य वाचून ते मराठीमध्ये लिहिण्याचे अतिरिक्त काम करावे लागले. असाच अनुभव मराठी माध्यमातून यूपीएससीची तयादी करणाऱ्या माझ्या अनेक मित्रांचा आहे. मला आलेल्या अडचणी इतरांना येऊ नयेत यासाठी आतापर्यंत वेगवेगळी सत्रे घेऊन इमेलच्या माध्यमातून परीक्षार्थीना जमेल तसे मार्गदर्शन करून व माझ्या अभ्यासाच्या निवडक नोट्स परीक्षार्थीना मोफत उपलब्ध करून मदत करण्याचा प्रयत्न मी आधी केला होता. आता या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामान्य अध्ययनाच्या पेपरमधील नीतिशास्त्र या विषयाविषयी सर्वसमावेशक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा अभ्यासक्रम बदलून मुख्य परीक्षेचे स्वरूप यूपीएससीप्रमाणे वर्णनात्मक केले असल्याने नीतिशास्त्र विषयावरील पुस्तकाची एमपीएससीच्या मुलांनाही अत्यंत गरज निर्माण झाली. हे पुस्तक विद्यार्थ्यांची ती गरज पूर्ण करेल अशी आशा आहे.