सारंगांच्या प्रस्तुत संग्रहात ज्या एकोणीस कथा आहेत त्या त्यांनी गेल्या दोन दशकात लिहिलेल्या आहेत. म्हणजे सरासरी वर्षाला एक कथा झाली. कथा हा वाङ्मयप्रकारच बिनमहत्वाचा आणि सवंग ठरवणारांना सारंग हे बाजारू रंजकतेला बळी गेलेले बहुप्रसव लोकप्रिय मराठी लेखक आहेत असे म्हणणे अवघड जाईल. सारंगांच्या ह्या सर्व कथा मराठी कथाकादंबरीच्या प्रतिनिधिक अनुकृतिवादी / वास्तववादी / स्वाभाविक चित्रणवादी धाटणीला मुळातून छेद देणाऱ्या आहेत. सुबोध त्याविषयी अस्वस्थ करणारे प्रश्न उभे करणाऱ्या त्या कृती आहेत. त्यांच्यातील चमत्कृती ही निव्वळ कल्पना विलास नाही किंवा लेखकाची मनोविकृती नाही. प्रकृती आणि विकृती यांच्यातल�... See more
सारंगांच्या प्रस्तुत संग्रहात ज्या एकोणीस कथा आहेत त्या त्यांनी गेल्या दोन दशकात लिहिलेल्या आहेत. म्हणजे सरासरी वर्षाला एक कथा झाली. कथा हा वाङ्मयप्रकारच बिनमहत्वाचा आणि सवंग ठरवणारांना सारंग हे बाजारू रंजकतेला बळी गेलेले बहुप्रसव लोकप्रिय मराठी लेखक आहेत असे म्हणणे अवघड जाईल. सारंगांच्या ह्या सर्व कथा मराठी कथाकादंबरीच्या प्रतिनिधिक अनुकृतिवादी / वास्तववादी / स्वाभाविक चित्रणवादी धाटणीला मुळातून छेद देणाऱ्या आहेत. सुबोध त्याविषयी अस्वस्थ करणारे प्रश्न उभे करणाऱ्या त्या कृती आहेत. त्यांच्यातील चमत्कृती ही निव्वळ कल्पना विलास नाही किंवा लेखकाची मनोविकृती नाही. प्रकृती आणि विकृती यांच्यातल्या जुजबी सीमारेषा सारंगांमधला कलावंत तत्ववेत्ता पुसून टाकतो. आणि मानवी अस्तित्वाविषयी आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक दडपले भय आणि आश्यर्य पुन्हा जागृत करतो. - दिलीप पुरुषोत्तम चित्रे