अजय पांडे रिहांदनगरच्या एनटीपीसी या मध्यममार्गी वसाहतीमध्ये मोठी स्वप्न उराशी बाळगत मोठा झाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण त्याने अलाहाबादच्या आयईआरटीमधून पूर्ण केलं आणि पुण्याच्या आयआयएममधून एमबीए केलं. त्यानंतर त्याला कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. आता सध्या तो कॉग्निझन्ट, पुणे येथे नोकरी करत आहे. त्याचं स्वप्न होतं शिक्षक बनायचं; परंतु दैवाने त्याला आयटी क्षेत्रात आणून सोडलं.
प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, वाचन हे त्याचे छंद आहेत. विविध ठिकाणी केलेल्या प्रवासातून त्याची ओळख विविध संस्कृती, लोकांशी झाली आणि वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य जगणारी लोक परस्परांशी एका अनाकलनीय बंध... See more
अजय पांडे रिहांदनगरच्या एनटीपीसी या मध्यममार्गी वसाहतीमध्ये मोठी स्वप्न उराशी बाळगत मोठा झाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण त्याने अलाहाबादच्या आयईआरटीमधून पूर्ण केलं आणि पुण्याच्या आयआयएममधून एमबीए केलं. त्यानंतर त्याला कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. आता सध्या तो कॉग्निझन्ट, पुणे येथे नोकरी करत आहे. त्याचं स्वप्न होतं शिक्षक बनायचं; परंतु दैवाने त्याला आयटी क्षेत्रात आणून सोडलं.
प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, वाचन हे त्याचे छंद आहेत. विविध ठिकाणी केलेल्या प्रवासातून त्याची ओळख विविध संस्कृती, लोकांशी झाली आणि वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य जगणारी लोक परस्परांशी एका अनाकलनीय बंधाने कशी जोडलेली राहतात, याचं कुतूहल त्याच्या मनात निर्माण झालं. ट्रेकिंगने त्याला जगण्यातली आव्हानं पेलायला शिकवलं, खेळांची आवड लागली. पुस्तक वाचनामुळे आयुष्य जगण्याची प्रेरणा जिवंत राहते असं त्याला वाटतं.
यू आर द बेस्ट वाइफ ही त्याने लिहिलेली पहिली कादंबरी, आपल्या आयुष्यातल्या सत्य घटना आणि जगण्यातून शिकलेले धडे त्याने यातून मांडले आहेत.
लेखनाव्यतिरिक्त त्याला आपला आदर्श असलेल्या मदर टेरेसा यांच्या मार्गावरून चालायचे आहे, समाजाचे ऋण फेडावे अशी त्याची इच्छा आहे. त्याकरता एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून वृद्धांना आधार आणि गरीब, गरजू मुलांना शिक्षण देण्याची योजना आहे.
आपल्या या पहिल्या कादंबरी नंतर अजयने अजून दोन बेस्टसेलर पुस्तके लिहिली आहेत, ज्यांची नावे - हर लास्ट विश आणि यू आर द बेस्ट फ्रेन्ड अशी आहेत.