व्यक्ती तितक्या प्रकृती' असे म्हटले जाते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अगणित व्यक्तींकडून त्यांच्या प्रकृती-प्रवृत्तींकडून माणूस कळत-नकळत शिकत असतो. म्हणूनच माणसांच्या स्वभावविभावाचे निरीक्षण ही एक विलक्षण अनुभूती मानली जाते. मानवाचे अवघे विश्व आणि त्याचे कलाविष्कार अशाच रंग-बेरंगांनी रंगले आहेत. त्यामुळेच तर ते रंग व्यक्तिचित्रणात उतरवणे ही एक अवघड कला. मराठी साहित्यात सिद्धहस्त लेखकांनी व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. ऋतुराज कशेळकर या कोकणातल्या मातीतून उमलून आलेल्या तरुणाच्या लेखणीतून उतरलेली ही अशीच अस्सल व्यक्तिचित्रे. हसवणारी, रडवणारी आणि अंतर्मुख करणारीसुद�... See more
व्यक्ती तितक्या प्रकृती' असे म्हटले जाते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अगणित व्यक्तींकडून त्यांच्या प्रकृती-प्रवृत्तींकडून माणूस कळत-नकळत शिकत असतो. म्हणूनच माणसांच्या स्वभावविभावाचे निरीक्षण ही एक विलक्षण अनुभूती मानली जाते. मानवाचे अवघे विश्व आणि त्याचे कलाविष्कार अशाच रंग-बेरंगांनी रंगले आहेत. त्यामुळेच तर ते रंग व्यक्तिचित्रणात उतरवणे ही एक अवघड कला. मराठी साहित्यात सिद्धहस्त लेखकांनी व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. ऋतुराज कशेळकर या कोकणातल्या मातीतून उमलून आलेल्या तरुणाच्या लेखणीतून उतरलेली ही अशीच अस्सल व्यक्तिचित्रे. हसवणारी, रडवणारी आणि अंतर्मुख करणारीसुद्धा. ती जितकी कलंदर आहेत तितकीच बिलंदरही...