श्रीमती गुणाबाई रा. गाडेकर ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि लढाऊ कार्यकर्ती. त्यांचे 'स्मृतिगंध' हे विस्मरणात गेलेले परंतु ऐतिहासिक मूल्य असलेले आत्मचरित्र पुन्हा प्रकाशात आणण्याचे डॉ. सुनीता सावरकर हिचे कार्य कौतुकास्पद आहे. आता हा मौल्यवान दस्तावेज पुन्हा आपल्या हातात असेल. त्या काळातील दलित स्त्रियांचे आत्मचरित्रात्मक लिखाण नसल्यासारखेच. या आत्मचरित्रामुळे एक सामर्थ्यवान, लवचिकता असलेली आणि संकटांना नियमितपणे सामोरे जाणारी महिलाही दिसून येते. दडपशाही आणि भेदभावाशी लढण्याची त्यांची इच्छाशक्ती किती दृढ होती हे निदर्शनास येते. गुणाबाईंच्या आत्मचरित्रात केवळ त्या... See more
श्रीमती गुणाबाई रा. गाडेकर ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि लढाऊ कार्यकर्ती. त्यांचे 'स्मृतिगंध' हे विस्मरणात गेलेले परंतु ऐतिहासिक मूल्य असलेले आत्मचरित्र पुन्हा प्रकाशात आणण्याचे डॉ. सुनीता सावरकर हिचे कार्य कौतुकास्पद आहे. आता हा मौल्यवान दस्तावेज पुन्हा आपल्या हातात असेल. त्या काळातील दलित स्त्रियांचे आत्मचरित्रात्मक लिखाण नसल्यासारखेच. या आत्मचरित्रामुळे एक सामर्थ्यवान, लवचिकता असलेली आणि संकटांना नियमितपणे सामोरे जाणारी महिलाही दिसून येते. दडपशाही आणि भेदभावाशी लढण्याची त्यांची इच्छाशक्ती किती दृढ होती हे निदर्शनास येते. गुणाबाईंच्या आत्मचरित्रात केवळ त्यांच्या स्वतःच्या जीवनाचाच नाही तर त्यांची मैत्रिण आणि सामाजिक चळवळीतील सहकारी सावित्रीबाई बोराडे यांचाही अत्यंत महत्तत्त्वाचा तपशील आहे. या आत्मचरित्रात दलित वर्गातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी, ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस आणि बहिष्कृत महिला समाज या सारख्या संघटनांमध्ये त्यांच्या कार्याचे वर्णन आहे. हे केवळ एका महिलेची कथा पुर्नप्रकाशित करण्याचे काम नाही तर पुनर्संचयित करण्याचे आणि आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला एक मौल्यवान ठेवा, सर्वांसाठी खुला करण्याचे महत्त्वपूर्ण काम आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी वाटचालीचे अनेक संदर्भ यामध्ये आहेत. त्यामुळे या आत्मचरित्राला एक वेगळे महत्त्व आहे. डॉ. सुनीता यांचे यातील योगदान कौतुकास्पद आहे.