‘अस्वस्थ मनाचे पडघम' हे पुस्तक म्हणजे एक कोलाज आहे असं मला वाटतं. प्रतिभेचा तिसरा डोळा लाभलेली ही लेखिका तिच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे, स्वतःला आलेल्या अनुभवांचे सूक्ष्म निरीक्षण करून या ललित गद्यलेखनातून व्यक्त झाली आहे. साधी, सरळ, सोपी अशी लेखनशैली असल्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या मनाची नक्कीच पकड घेईल. पुस्तकातील लेखांमध्ये अनेक माणसं, त्या माणसांशी जुळलेले नातेसंबंध, प्रवासात भेटलेल्या माणसांच्या जाणीवा, त्यांच्या भावभावना, स्वतःला आलेले कडू-गोड अनुभव, समाजातील घडणाऱ्या घटनांनी मनात उमटणारे पडसाद, समाजातील वास्तव या साऱ्यांचा समावेश पुस्तकात आहे. लेखिकेच्या अंतर्मनात उमटलेल्या पडसादां�... See more
‘अस्वस्थ मनाचे पडघम' हे पुस्तक म्हणजे एक कोलाज आहे असं मला वाटतं. प्रतिभेचा तिसरा डोळा लाभलेली ही लेखिका तिच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे, स्वतःला आलेल्या अनुभवांचे सूक्ष्म निरीक्षण करून या ललित गद्यलेखनातून व्यक्त झाली आहे. साधी, सरळ, सोपी अशी लेखनशैली असल्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या मनाची नक्कीच पकड घेईल. पुस्तकातील लेखांमध्ये अनेक माणसं, त्या माणसांशी जुळलेले नातेसंबंध, प्रवासात भेटलेल्या माणसांच्या जाणीवा, त्यांच्या भावभावना, स्वतःला आलेले कडू-गोड अनुभव, समाजातील घडणाऱ्या घटनांनी मनात उमटणारे पडसाद, समाजातील वास्तव या साऱ्यांचा समावेश पुस्तकात आहे. लेखिकेच्या अंतर्मनात उमटलेल्या पडसादांचा टिपेला पोहोचलेला स्वर, असंख्य जाणीवांनी अस्वस्थ होऊन मेंदूमध्ये सतत घणाणणारे पडघम या पुस्तकातून लेखिकेने मांडले आहेत. साऱ्या अनुभवांचे कोलाज या गद्य ललित लेखनात सामावलेलं आहे. --- अच्युत गोडबोले