आजच्या धकाधकीच्या आयुष्यात निरामय आयुष्य जगणे, हे जवळपास अशक्य झाले आहे. आणि जर आपल्याला निरामय आयुष्य जगायचे असेल, तर योगसाधने शिवाय पर्याय नाही. तुमची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक अशा सर्वच स्तरांतील प्रगती केवळ योगानेच साध्य होणार आहे, यात दुमत नाही. मग ही योगसाधना सर्वसामान्यांपासून एवढी दूर का ? कारण योगाबद्दल माहिती देणारी परिणामकारक साधने सहजतेने उपलब्ध नाहीत आणि जी आहेत ते समजावून घेणे अत्यंत कठीण आहे. आणि हीच उणीव या पुस्तकातून सहज भरून निघते. सोप्या व सहज अशा आकलनीय भाषेत योगा समजावून घेणे या पुस्तकाद्वारे निश्चितच शक्य आहे.
या पुस्तकाचे वाचन करून प्रत्येकजण आपल्या आयुष्य�... See more
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात निरामय आयुष्य जगणे, हे जवळपास अशक्य झाले आहे. आणि जर आपल्याला निरामय आयुष्य जगायचे असेल, तर योगसाधने शिवाय पर्याय नाही. तुमची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक अशा सर्वच स्तरांतील प्रगती केवळ योगानेच साध्य होणार आहे, यात दुमत नाही. मग ही योगसाधना सर्वसामान्यांपासून एवढी दूर का ? कारण योगाबद्दल माहिती देणारी परिणामकारक साधने सहजतेने उपलब्ध नाहीत आणि जी आहेत ते समजावून घेणे अत्यंत कठीण आहे. आणि हीच उणीव या पुस्तकातून सहज भरून निघते. सोप्या व सहज अशा आकलनीय भाषेत योगा समजावून घेणे या पुस्तकाद्वारे निश्चितच शक्य आहे.
या पुस्तकाचे वाचन करून प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील विविध पातळ्यांवर परमोच्च स्थान मिळवू शकतो, अशी खात्री मला वाटते. या पुस्तकांमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अवलंबून तुम्ही आनंदी, सुखी, निरामय आयुष्य जगायला सुरुवात कराल.
शुभेच्छा. धन्यवाद.....