(Mental Disorder & YOU - Second Edition) या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर) 'मानसिक आजार' आणि 'मानसिक आरोग्य' या संदर्भातील सर्व माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून देणारे सचित्र पुस्तक. या पुस्तकामध्ये मानसिक समस्या आणि मानसिक आजार यावर प्रतिबंधक उपाय म्हणून 'आंतरनिरसन' (इंटरव्हेन्शन्स) माध्यमाचा वापर करण्यावर आणि मानसिक आरोग्याची वाढ करण्यावर भर दिला आहे. सदर माहिती मनोरुग्ण आणि रुग्णांचे कुटुंबीय, एकूण समाज, मानसिक कार्यकर्ते, वैद्यकीय डॉक्टर्स, नर्सेस, सोशल वर्कर्स, मनोवैज्ञानिक, नर्सिंग आणि वैद्यकीय विद्यार्थी, समुपदेशक यांच्यासाठी उपयुक्त आहे.