भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योजक हे नावीन्य, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीचे मुख्य चालक आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन दशकात अनेक पहिल्या पिढीतले उद्योजक तयार झाले. "नवउद्योजकांची यशोगाथा" या पुस्तकात अशा ४७ नवउद्योजकांचा प्रवास रेखाटला आहे. विविध क्षेत्रातील हे उद्योजक युवा पिढीतले आयकॉन्स आहेत. या पुस्तकात स्टार्टअप नवउद्योजकांना मदत करणाऱ्या संस्था देआसरा, पिनॅकल एआयसी, एमसीसीआयए या संस्थांची माहिती देखील वाचायला मिळणार आहे. इन्फोसिस, पर्सिस्टंट, बेलराइज इंडस्ट्रीज या उद्योगांचा जीवनप्रवासही वाचकांना अनुभवायला मिळेल