आज 'मेडिटेशन' किंवा 'ध्यानधारणा' हा शब्द कॉर्पोरेट जगतामध्येही प्रचलित झालेला दिसतो.
प्रत्येकाला जीवनाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करायचं असतं. रॅट रेसमध्ये पहिले आलो तरीही आपण रॅटच राहणार हा विचार करण्याचीही फुरसत माणसाला नसते. याचा परिणाम म्हणजे स्ट्रेस नावाचा राक्षस तुम्हाला कायमचा ग्रासतो. त्याच्याशी निगडित आजार जसं उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग इत्यादी माणसाचं स्वास्थ्य पोखरून टाकतात.
स्वामी विवेकानंदांनी १२५ वर्षांपूर्वी ध्यान आणि त्याच्या पद्धती यांवर केलेली भाषणं आपण वाचली तर लक्षात येईल की, आजच्या तरुणांच्या सर्व समस्यांचं इतकं परिपूर्... See more
आज 'मेडिटेशन' किंवा 'ध्यानधारणा' हा शब्द कॉर्पोरेट जगतामध्येही प्रचलित झालेला दिसतो.
प्रत्येकाला जीवनाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करायचं असतं. रॅट रेसमध्ये पहिले आलो तरीही आपण रॅटच राहणार हा विचार करण्याचीही फुरसत माणसाला नसते. याचा परिणाम म्हणजे स्ट्रेस नावाचा राक्षस तुम्हाला कायमचा ग्रासतो. त्याच्याशी निगडित आजार जसं उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग इत्यादी माणसाचं स्वास्थ्य पोखरून टाकतात.
स्वामी विवेकानंदांनी १२५ वर्षांपूर्वी ध्यान आणि त्याच्या पद्धती यांवर केलेली भाषणं आपण वाचली तर लक्षात येईल की, आजच्या तरुणांच्या सर्व समस्यांचं इतकं परिपूर्ण, अचूक, बिनतोड, मार्मिक आणि चपखल समाधान अन्यत्र सापडणं दुर्मीळ आहे. ध्यानाला बसायची जागा कशी असावी इथपासून ते ध्यान करताना बाळगण्याची सावधगिरी, योगशास्त्रानुसार ध्यानाच्या पायऱ्या कोणत्या, मनाला ध्यानासाठी कसं तयार करावं हे सांगताना हळूहळू स्वामीजी आपल्याला ध्यानाच्या परमोच्च स्तराकडे घेऊन जातात.
मानवी जीवनाचं परमोच्च ध्येय म्हणजे ईश्वरप्राप्ती असा ज्यांचा निश्चय झालेला आहे त्यांना या पुस्तकातून साधनमार्गावर दृढतेने कसं चालावं याचा वस्तुपाठ मिळेल. ज्यांना मानवी जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे अजून तितकंसं उमगलेलं नसेल त्यांना हे पुस्तक आत्मोद्धाराचा मार्ग दाखवेल.