हे पुस्तक 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित झालं, तेव्हापासून आजवर ते जागतिक स्तरावरचं सर्वाधिक खपाचं पुस्तक आणि बिझनेस क्लासिक ठरलं आहे. या विस्तारीत व सुधारित आवृत्तीत चार नवीन प्रकरणं समाविष्ट आहेत. लोकसंपर्काचं जाळं, आपलं व्यक्तिगत आयुष्य आणि आजचं जग यांबाबतीत हे तत्त्व कसं अमलात आणावं हे सांगताना लेखक त्यांच्या ‘आपल्या 20 टक्के प्रयत्नांतूनच 80 टक्के परिणाम साधला जातो’ या प्रेरणादायी व असामान्य संदेशाला नवीन-अद्ययावत जोडही देत आहेत. महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून कमीत कमी कष्टांत, वेळेत आणि संसाधनांसह जास्तीत जास्त परिणाम कसे साध्य करता येतात, हे लेखक या पुस्तकातून जिवंत उदाहरणे �... See more
हे पुस्तक 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित झालं, तेव्हापासून आजवर ते जागतिक स्तरावरचं सर्वाधिक खपाचं पुस्तक आणि बिझनेस क्लासिक ठरलं आहे. या विस्तारीत व सुधारित आवृत्तीत चार नवीन प्रकरणं समाविष्ट आहेत. लोकसंपर्काचं जाळं, आपलं व्यक्तिगत आयुष्य आणि आजचं जग यांबाबतीत हे तत्त्व कसं अमलात आणावं हे सांगताना लेखक त्यांच्या ‘आपल्या 20 टक्के प्रयत्नांतूनच 80 टक्के परिणाम साधला जातो’ या प्रेरणादायी व असामान्य संदेशाला नवीन-अद्ययावत जोडही देत आहेत. महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून कमीत कमी कष्टांत, वेळेत आणि संसाधनांसह जास्तीत जास्त परिणाम कसे साध्य करता येतात, हे लेखक या पुस्तकातून जिवंत उदाहरणे आणि तपशिलांसह दाखवून देतात.