सामान्यापेक्षा वेगळं असं जेव्हा तुम्ही काही करता, तेव्हा तुमचं मानसिक प्रोग्रॅमिंग म्हणजेच तुमचे आदर्श तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. ‘यशस्विता’ हेच तुमचं ध्येय आहे, तर तुम्ही अखंडित प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. तुमचे आदर्श हे समाधान, भय, चिंता, अस्वस्थता, असुरक्षितता, स्वतःविषयी शंका, उतावळेपणा आणि आत्म-घृणा यांच्या मागे दडलेले असू शकतात. याचा परिणाम असा होतो की, ते तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवतात आणि एका मर्यादेतच तुम्हाला बंदिस्त करतात. परिणामी तुम्ही तुमच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना पूर्ण करू शकत नाही. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही तुमच्या विचारांत बदल घडवण्याची आवश्यकता आ... See more
सामान्यापेक्षा वेगळं असं जेव्हा तुम्ही काही करता, तेव्हा तुमचं मानसिक प्रोग्रॅमिंग म्हणजेच तुमचे आदर्श तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. ‘यशस्विता’ हेच तुमचं ध्येय आहे, तर तुम्ही अखंडित प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. तुमचे आदर्श हे समाधान, भय, चिंता, अस्वस्थता, असुरक्षितता, स्वतःविषयी शंका, उतावळेपणा आणि आत्म-घृणा यांच्या मागे दडलेले असू शकतात. याचा परिणाम असा होतो की, ते तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवतात आणि एका मर्यादेतच तुम्हाला बंदिस्त करतात. परिणामी तुम्ही तुमच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना पूर्ण करू शकत नाही. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही तुमच्या विचारांत बदल घडवण्याची आवश्यकता आहे. बदल घडवणं सोपं नाहीये; पण निर्विवादपणे फायदेशीर आहे आणि त्याचे परिणाम चिरस्थायी आहेत. या प्रयत्नासाठी लेखक आजमावलेल्या तंत्राविषयी सांगतील. हे पुस्तक त्यांचा दशकांचा अभ्यास, त्याचा वास्तविक जगात केलेला उपयोग आणि शैक्षणिक अनुभव यांवर प्रकाश टाकेल.