जॉर्ज सॅम्युअल क्लासन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्कामध्ये शिक्षण घेतले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात ते अमेरिकेच्या बाजूने लढले. त्यांनी ‘क्लासन मॅप कंपनी ऑफ डेन्व्हर, कोलोरेडो’ची स्थापना केली आणि अमेरिका-कॅनडामधील रस्त्यांचा पहिला नकाशा प्रसिद्ध केला. 1926 मध्ये, त्यांनी ‘बचत आणि आर्थिक यश’ या विषयावरच्या पत्रकांची पहिली मालिका प्रसिद्ध केली. त्यातील प्रत्येक मुद्दा पटवून सांगण्याकरता प्राचीन बॅबिलॉनमधील बोधकथांचा वापर केला. ही पत्रके बँकांनी आणि विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या ग्राहकांमध्ये वितरित केली. लाखो लोकांनी या कथा वाचल्या आणि त्यांचा लाभ घेतला. बॅबिलॉनच्या या बोधकथांना आ... See more
जॉर्ज सॅम्युअल क्लासन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्कामध्ये शिक्षण घेतले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात ते अमेरिकेच्या बाजूने लढले. त्यांनी ‘क्लासन मॅप कंपनी ऑफ डेन्व्हर, कोलोरेडो’ची स्थापना केली आणि अमेरिका-कॅनडामधील रस्त्यांचा पहिला नकाशा प्रसिद्ध केला. 1926 मध्ये, त्यांनी ‘बचत आणि आर्थिक यश’ या विषयावरच्या पत्रकांची पहिली मालिका प्रसिद्ध केली. त्यातील प्रत्येक मुद्दा पटवून सांगण्याकरता प्राचीन बॅबिलॉनमधील बोधकथांचा वापर केला. ही पत्रके बँकांनी आणि विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या ग्राहकांमध्ये वितरित केली. लाखो लोकांनी या कथा वाचल्या आणि त्यांचा लाभ घेतला. बॅबिलॉनच्या या बोधकथांना आधुनिक काळातील प्रेरणा देणारे अभिजात साहित्य मानले जाते.