मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्या�... See more
मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.'
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ तर होतेच; पण भारताचे राष्ट्रपती, शिक्षक व मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणूनही ते अतिशय लोकप्रिय होते. आपली उक्ती आणि कृती या दोन्हींच्या माध्यमांतून त्यांनी मनामनात स्वतःचे विशेष असे स्थान निर्माण केले. भारतामध्ये लोकांचा इतका स्नेह व आदर मिळवणार्या त्यांच्यासारख्या अगदी मोजक्याच व्यक्ती असतील.
हे पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली आदरांजली आहे. यात त्यांच्या बालपणीचे व तरुणपणीचे, फारसे परिचित नसलेले अनेक रंजक तसेच प्रेरणादायी प्रसंग वाचायला मिळतील, ज्यांतून कलामांच्या महान व्यक्तित्वाची जडणघडण झाली.
या पुस्तकात वापरण्यात आलेल्या चित्रांच्या माध्यमातून वाचक त्यांच्या जीवनकार्याचा चैतन्यदायी अनुभव घेऊ शकतील. पुस्तकात गुंफण्यात आलेले त्यांच्या आयुष्यातील हे प्रसंग म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोतच होय. "