प्रसिद्ध अभिनेता रमेश भाटकर यास बलात्काराच्या खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आलं होतं. माणसांवर नितांत प्रेम करणारा रमेश. त्याचा सांस्कृतिक क्षेत्रातला उमदा वावर, प्रसिद्धीचं वलय, पण ह्या घटनेने तो कोमेजून गेला होता. रमेशची पत्नी मदुला भाटकर न्यायमूर्ती असल्यामुळे हा बलात्काराचा डाग पूर्ण खोटा असला तरी तो पुसण्यासाठीची कायदेशीर लढाई अधिक कठीण होती. या खटल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. मात्र ते एकमेकाच्या सहाय्याने, प्रेमाच्या आधारावर लढले. त्यांचा हा जगण्याला भिडण्याचा अनुभव ! समाजाला या आणि अशा हादरवणाऱ्या घटनांची माहिती नसते. म्हणून ही न्यायासाठी, सत्याच्या आधा... See more
प्रसिद्ध अभिनेता रमेश भाटकर यास बलात्काराच्या खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आलं होतं. माणसांवर नितांत प्रेम करणारा रमेश. त्याचा सांस्कृतिक क्षेत्रातला उमदा वावर, प्रसिद्धीचं वलय, पण ह्या घटनेने तो कोमेजून गेला होता. रमेशची पत्नी मदुला भाटकर न्यायमूर्ती असल्यामुळे हा बलात्काराचा डाग पूर्ण खोटा असला तरी तो पुसण्यासाठीची कायदेशीर लढाई अधिक कठीण होती. या खटल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. मात्र ते एकमेकाच्या सहाय्याने, प्रेमाच्या आधारावर लढले. त्यांचा हा जगण्याला भिडण्याचा अनुभव ! समाजाला या आणि अशा हादरवणाऱ्या घटनांची माहिती नसते. म्हणून ही न्यायासाठी, सत्याच्या आधाराने केलेल्या लढाईची गोष्ट - 'हे सांगायला हवं!'