भारतीय तत्त्वज्ञान उपनिषदांमधून सांगितले गेले आहे. वेद आणि ब्राह्मण ग्रंथ हे यज्ञसंस्कृतीला पूरक असे साहित्य, यज्ञांत म्हटली जाणारी सूक्ते वेदांमध्ये होती आणि त्या सूक्तांचा कोणत्या यज्ञात कधी वापर करायचा हे सांगण्यासाठी ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली; पण नंतरच्या काळात माणूस केवळ कर्मकांडात न रमता संसारातून थोडा बाजूला होऊन अरण्यात राहून जगाच्या निर्मितीविषयी विचार करू लागला तेव्हा उपनिषदांची निर्मिती झाली. उपनिषदांमध्ये वेदांचे सार आहे. त्यामुळेच उपनिषदे, वेदवाङ्मय यांविषयी सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. 'उपनिषद' हे संवादरूप साहित्य आहे. संवादाच्या माध्यमातून एखादी कथाच आपल�... See more
भारतीय तत्त्वज्ञान उपनिषदांमधून सांगितले गेले आहे. वेद आणि ब्राह्मण ग्रंथ हे यज्ञसंस्कृतीला पूरक असे साहित्य, यज्ञांत म्हटली जाणारी सूक्ते वेदांमध्ये होती आणि त्या सूक्तांचा कोणत्या यज्ञात कधी वापर करायचा हे सांगण्यासाठी ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली; पण नंतरच्या काळात माणूस केवळ कर्मकांडात न रमता संसारातून थोडा बाजूला होऊन अरण्यात राहून जगाच्या निर्मितीविषयी विचार करू लागला तेव्हा उपनिषदांची निर्मिती झाली. उपनिषदांमध्ये वेदांचे सार आहे. त्यामुळेच उपनिषदे, वेदवाङ्मय यांविषयी सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. 'उपनिषद' हे संवादरूप साहित्य आहे. संवादाच्या माध्यमातून एखादी कथाच आपल्यासमोर उलगडत जाते. शिवाय याच कथांच्या माध्यमातून आजच्या आधुनिक काळाशी संबंधित ठरतील अशा अनेक उपयुक्त गोष्टीही वाचायला मिळतात. त्यामुळेच लहानांसह तरुण पिढीनेही त्या वाचायला हव्यात. मूल्यशिक्षण त्यांच्या मनात सहजपणे रुजावे, यासाठी तर या कथा अतिशय महत्त्वाच्या ठरतात. दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा याशिवाय प्राचीन शिक्षण पद्धती, गुरू-शिष्यांचे अनेकपदरी नाते या पुस्तकातून उलगडायला मदत होईल.
लेखिकेविषयी : डॉ.अंजली माधव पर्वते यांनी अध्यात्म रामायण - एक चिकित्सक अभ्यास हा त्यांचा संशोधनाचा विषय. सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालय तसेच वाई येथील किसनवीर महाविद्यालयात त्यांनी संस्कृत प्राध्यापिका म्हणून काम केलेले आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागासह त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. श्रीमद्भगवद्गीता, शंकराचार्य-चरित्र व तत्त्वज्ञान, वाल्मीकी आणि अन्य रामकथा, शतककाव्ये इ.विषयांवर मुंबई, देवरुख रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मसूर येथे व्याख्याने, प्रवचने, विविध चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शक तसेच पीएच. डी. गाईड म्हणूनही त्यांनी काम केले आहे.