डॉ. जो डिस्पेन्झा यांनी रट्जर्स युनिव्हर्सिटी येथे बायोकेमिस्ट्रिचे शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूरोसायन्स या विषयावर भर देऊन बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. अटलांटा शहरातल्या ‘लाइफ युनिव्हर्सिटी’मधून त्यांनी विशेष प्रावीण्यासह ‘डॉक्टर ऑफ कायरोप्रॅक्टिक’ची पदवी मिळवली. डॉ. डिस्पेन्झा यांनी मज्जातंतू विज्ञान व शास्त्रीय अभ्यास, मेंदूचे कार्य आणि त्यातील संबंधित रसायने आणि पेशीरचनाशास्त्र या विषयांवर पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले. स्मृती-निर्मिती, वार्धक्य- प्रक्रिया आणि दीर्घायुष्य या विषयांत ते सातत्याने नवनवे ज्ञान संपादन करत असतात.
‘व्हॉट द ब्लीप डू वी नो!?’ या पुरस्कारप्राप्त चित्रपट... See more
डॉ. जो डिस्पेन्झा यांनी रट्जर्स युनिव्हर्सिटी येथे बायोकेमिस्ट्रिचे शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूरोसायन्स या विषयावर भर देऊन बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. अटलांटा शहरातल्या ‘लाइफ युनिव्हर्सिटी’मधून त्यांनी विशेष प्रावीण्यासह ‘डॉक्टर ऑफ कायरोप्रॅक्टिक’ची पदवी मिळवली. डॉ. डिस्पेन्झा यांनी मज्जातंतू विज्ञान व शास्त्रीय अभ्यास, मेंदूचे कार्य आणि त्यातील संबंधित रसायने आणि पेशीरचनाशास्त्र या विषयांवर पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले. स्मृती-निर्मिती, वार्धक्य- प्रक्रिया आणि दीर्घायुष्य या विषयांत ते सातत्याने नवनवे ज्ञान संपादन करत असतात.
‘व्हॉट द ब्लीप डू वी नो!?’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात सहभागी असलेल्या अनेक शास्त्रज्ञ, संशोधक व शिक्षकांपैकी डॉ. जो हे एक आहेत. मानवी मेंदूचा उपयोग व कार्य या विषयावर त्यांनी जगातील जवळपास 24 देशांंमध्ये व्याख्याने दिली आहेत.
प्रवास किंवा लेखन करत नसताना डॉ. जो ऑलिंपिया (वॉशिंग्टन) येथील त्यांच्या कायरोप्रॅक्टिक क्लिनिक्मध्ये रुग्णांना भेटण्यामध्ये व्यस्त असतात.