॥शिवराज्याभिषेक ॥ शिवराज्याभिषेकाची समग्र माहिती देणारा एकमेव ग्रंथ मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी १९-२०व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविधांगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असे एकही पुस्तक नसावे, ही साहित्यविश्वातील आजवरची मोठी उणीवच होती. छत्रपती संभाजी महाराज, गागाभट्ट, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन यांसारख्या समकालीनांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या केलेल्या वर्णनांसोबतच, या ग्रंथात आधुनिक इतिहासकार-अभ्यासकांनी राज्याभिषेकासं... See more
॥शिवराज्याभिषेक ॥ शिवराज्याभिषेकाची समग्र माहिती देणारा एकमेव ग्रंथ मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी १९-२०व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविधांगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असे एकही पुस्तक नसावे, ही साहित्यविश्वातील आजवरची मोठी उणीवच होती. छत्रपती संभाजी महाराज, गागाभट्ट, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन यांसारख्या समकालीनांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या केलेल्या वर्णनांसोबतच, या ग्रंथात आधुनिक इतिहासकार-अभ्यासकांनी राज्याभिषेकासंदर्भात केलेले लेखन ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या संपादकत्वाखाली एका सूत्रात गुंफण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाची सांगोपांग माहिती देत या घटनेमुळे झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उत्क्रांतीची चर्चा करणारा मराठी साहित्यविश्वातील हा पहिलाच प्रयोग आहे. '६ जून - शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्यदिन म्हणून महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून साजरा व्हावा, यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यात मला यशही आले. हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करतानाच, त्याला वैचारिक अधिष्ठानही असावे या उद्देशाने शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाच्या औचित्याने हा ग्रंथ आम्ही साकारला आहे. ---- अनिल निवृत्ती पवार (संकल्पना, संकलन व प्रकाशन)