कंधार हे राष्ट्रकूट काळातील एक महत्त्वाचे केंद्र, एक नगर म्हणून या स्थानाचा विकास झाला. राष्ट्रकूट दुसरा या शासकाने आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे जगत्तुंग हा जलाशय निर्माण केला. तर कृष्ण तिसरा याने नियोजनपूर्वक या स्थानाचा विकास केला. येथे बौद्ध, जैन व हिंदू परंपरा विकसित झाल्या. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने कंधार किल्ल्याचा विकास झाला. येथे खिलजी, तुघलक, बहामनी, दिल्लीचे मुघल व निझाम यांची सत्ता होती. या पुस्तकात कंधार किल्ला व परिसराची भौगोलिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे, तसेच येथील नगररचना, धर्म व पंथ, येथील स्मारके, जलव्यवस्थापन यांची सविस्त�... See more
कंधार हे राष्ट्रकूट काळातील एक महत्त्वाचे केंद्र, एक नगर म्हणून या स्थानाचा विकास झाला. राष्ट्रकूट दुसरा या शासकाने आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे जगत्तुंग हा जलाशय निर्माण केला. तर कृष्ण तिसरा याने नियोजनपूर्वक या स्थानाचा विकास केला. येथे बौद्ध, जैन व हिंदू परंपरा विकसित झाल्या. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने कंधार किल्ल्याचा विकास झाला. येथे खिलजी, तुघलक, बहामनी, दिल्लीचे मुघल व निझाम यांची सत्ता होती. या पुस्तकात कंधार किल्ला व परिसराची भौगोलिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे, तसेच येथील नगररचना, धर्म व पंथ, येथील स्मारके, जलव्यवस्थापन यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच या भागात आढळलेले कन्नड, देवनागरी, फारसी व अरबी शिलालेख हे छायाचित्र व लीप्यांतरासहित दिलेले आहेत. तसेच कंधार येथे आढळणाऱ्या मुर्त्या व शिल्पवैभव यांची सुमारे ७० पानांमध्ये रंगीत छायाचित्रे दिलेली आहेत. या सर्वांमुळे हा एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ झालेला आहे.