सम्राट चन्द्रकेतु महाराज,वीरभद्र आदी सर्व लोकांच्या नेत्रात कमालीची उत्सुकता दिसू लागली. तेजस्विनीचे हृदय धडधडले. तिचे चित्त कावरेबावरे झाले. आपला प्रियकर कोण असावा याबद्दल ती नेहमी घोटाळ्यात पडत असे. आज आता तो क्षण आला होता. नेत्रात प्राण आणून तेजस्विनी त्या योध्याकडे पाहू लागली, त्या योध्याने शांतपणे आपल्या मुखावरील पातळ दूर केले. त्या मुखपटला आड लपलेला त्याचा तेजस्वी आणि सुंदर चेहरा दृष्टीस पडला; मात्र.... अचानक विद्युतपात होऊन त्याच्या प्रखर तेजाने स्थळकाळाची शुद्ध हरपावी तसा प्रकार तेथे घडला. स्वतः कृष्णांत पावलाखालील धरित्री अचानक फाटावी तसा दचकून मागे धडपडला. "युवराज कुणाल?" कृष्णांत अविश्व... See more
सम्राट चन्द्रकेतु महाराज,वीरभद्र आदी सर्व लोकांच्या नेत्रात कमालीची उत्सुकता दिसू लागली. तेजस्विनीचे हृदय धडधडले. तिचे चित्त कावरेबावरे झाले. आपला प्रियकर कोण असावा याबद्दल ती नेहमी घोटाळ्यात पडत असे. आज आता तो क्षण आला होता. नेत्रात प्राण आणून तेजस्विनी त्या योध्याकडे पाहू लागली, त्या योध्याने शांतपणे आपल्या मुखावरील पातळ दूर केले. त्या मुखपटला आड लपलेला त्याचा तेजस्वी आणि सुंदर चेहरा दृष्टीस पडला; मात्र.... अचानक विद्युतपात होऊन त्याच्या प्रखर तेजाने स्थळकाळाची शुद्ध हरपावी तसा प्रकार तेथे घडला. स्वतः कृष्णांत पावलाखालील धरित्री अचानक फाटावी तसा दचकून मागे धडपडला. "युवराज कुणाल?" कृष्णांत अविश्वाने ओरडला. "युवराज कुणाल...." सम्राट महाराजांना तो धक्का अनपेक्षित होता. आनंदातिशयाने क्षणभर त्यांना मूर्च्छा आली. "युवराज.." तेजास्वीनीचे मुख क्षणभर निस्तेज बनले. तथापि, दुसरयाच क्षणी तिच्या सुंदर चेहऱ्यावर लज्जेने रक्तिमा फुलविला. वीरभद्राच्या नेत्रात अश्रू दाटून आले. "होय; युवराज कुणाल!" तो योध्दा शांतपणे म्हणाला. "परंतु निर्बल, बुद्धिहीन आणि निस्तेज युवराज नव्हे." "अशक्य... अशक्य..." कृष्णांताचा अद्यापही विश्वास बसत नव्हता.