सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २००हून अधिक कथा, कादंबर्या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्या आणि ५ कथासंग्रहांचासमावेश आहे. रहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण क�... See more
सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २००हून अधिक कथा, कादंबर्या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्या आणि ५ कथासंग्रहांचासमावेश आहे. रहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत. 1.द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स 2.अ स्टडी इन स्कार्लेट 3.द व्हॅली ऑफ फीअर 4.द साईन ऑफ फोर