हे पुस्तक म्हणजे केवळ संत कबीरांचे दोहे व त्यांचा अर्थ सांगणारे रुक्ष पुस्तक नाही. मुलांची मानसिकता ओळखणाऱ्या, त्यांच्या आवडत्या लेखिका संजीवनी बोकीलताईंनी त्यांना गोष्टीचं रूप दिलंय. कबीरांचा एक दोहा व त्याचा अर्थ सांगताना त्यांनी एक रंजक कथा लिहिली आहे आणि त्यातून बोधसंस्कार करण्याचा छान उपक्रम केला आहे. 'गोष्टींतून कबीर' हे पुस्तक म्हणजे तुम्हाला आवडतील अशा गोष्टींतून आनंद देणारा खजिना आहे. तो केवळ हे पुस्तक सदैव जवळ ठेवणाऱ्या वाचकांनाच मिळणार आहे. तसेच तो कथेच्या शेवटी आलेला दोहा पाठ करणाऱ्यांना संस्कारसंपन्न करणारा आहे. पुस्तकातली प्रत्येक गोष्ट ही आजच्या काळातली, तुम्ही जिच्याशी 'रिलेट' क�... See more
हे पुस्तक म्हणजे केवळ संत कबीरांचे दोहे व त्यांचा अर्थ सांगणारे रुक्ष पुस्तक नाही. मुलांची मानसिकता ओळखणाऱ्या, त्यांच्या आवडत्या लेखिका संजीवनी बोकीलताईंनी त्यांना गोष्टीचं रूप दिलंय. कबीरांचा एक दोहा व त्याचा अर्थ सांगताना त्यांनी एक रंजक कथा लिहिली आहे आणि त्यातून बोधसंस्कार करण्याचा छान उपक्रम केला आहे. 'गोष्टींतून कबीर' हे पुस्तक म्हणजे तुम्हाला आवडतील अशा गोष्टींतून आनंद देणारा खजिना आहे. तो केवळ हे पुस्तक सदैव जवळ ठेवणाऱ्या वाचकांनाच मिळणार आहे. तसेच तो कथेच्या शेवटी आलेला दोहा पाठ करणाऱ्यांना संस्कारसंपन्न करणारा आहे. पुस्तकातली प्रत्येक गोष्ट ही आजच्या काळातली, तुम्ही जिच्याशी 'रिलेट' करू शकाल अशीच आहे. त्या गोष्टीमुळे, संत कबीरांनी दोह्यांतून केलेला हितोपदेश, म्हणजे जीवनात कसं वागावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे तुम्हाला समजेल. हाच मन उन्नत करणारा व विचार संपन्न करणारा संस्कार होय. अशा संस्कारांचा एक खजिनाच तुमच्या हाती येतो आहे. त्या खजिन्यात शिरण्यासाठी मंत्र आहे- 'गोष्टींतून कबीर.'