बाबा भांड
जन्म 28-7-1949 ला एका सुदूर खेड्यात. शिक्षण एम. ए. (इंग्रजी). आठवीत असताना बालवीर चळवळीत राष्ट्रपतीपदकाने सन्मानित. प्रारंभीच्या महाविद्यालयीन जीवनात बालवीरांच्या जागतिक मेळाव्यात सहभाग व दहा देशांचा प्रवास. तेव्हापासून सर्जनशील लेखनास सुरूवात. 1875 मध्ये पत्नी सौ. आशासोबतच धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना. या संस्थांकडून आतापर्यंत सुमारे 1800 हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन. ग्रामीण विकासाअंतर्गत जन्मगावी पाणलोट क्षेत्रविकासाचे काम. गरीब अपंग, मूकबधिर मुलांसाठी शाळा. नवसाक्षरांसाठी ‘शब्दसंगत’ आणि ‘साकेत सवंगडी’ या नियतकालिकांचे संपादन, प्रकाशन. बाबा भांड यांच्या नऊ कादंबर्या, दोन कथासंग्रह, ... See more
बाबा भांड
जन्म 28-7-1949 ला एका सुदूर खेड्यात. शिक्षण एम. ए. (इंग्रजी). आठवीत असताना बालवीर चळवळीत राष्ट्रपतीपदकाने सन्मानित. प्रारंभीच्या महाविद्यालयीन जीवनात बालवीरांच्या जागतिक मेळाव्यात सहभाग व दहा देशांचा प्रवास. तेव्हापासून सर्जनशील लेखनास सुरूवात. 1875 मध्ये पत्नी सौ. आशासोबतच धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना. या संस्थांकडून आतापर्यंत सुमारे 1800 हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन. ग्रामीण विकासाअंतर्गत जन्मगावी पाणलोट क्षेत्रविकासाचे काम. गरीब अपंग, मूकबधिर मुलांसाठी शाळा. नवसाक्षरांसाठी ‘शब्दसंगत’ आणि ‘साकेत सवंगडी’ या नियतकालिकांचे संपादन, प्रकाशन. बाबा भांड यांच्या नऊ कादंबर्या, दोन कथासंग्रह, चार प्रवासवर्णने, चार आरोग्याची पुस्तके, पंचवीस संपादित पुस्तके, पंधरा किशोर कादंबर्या, पंचवीस बालकथासंग्रह, तीन एकांकिका, सत्तावीस नवसाक्षरांसाठी पुस्तके प्रकाशित.