एक होती माया माया ताडोबाची राणी कशी बनली ? कसा होता तिचा स्वभाव? का जगली नाहीत तिची पिल्लं? का गेले तिच्या हातून माणसांचे बळी? कशी झाली ती रहस्यमयरित्या गायब? या आणि अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न म्हणजे ‘एक होती माया’ हे पुस्तक. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जगप्रसिद्ध वाघीण मायाच्या जन्मापासून ती नाहीशी होण्यापर्यंतचा नाट्यमय प्रवास हे पुस्तक रंजकपणे मांडतं. अनंत सोनवणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मायाच्या जीवनातल्या कधीही न ऐकलेल्या थरारक कहाण्या वाचायला मिळतात. सोबत आहेत नाट्यमय प्रसंगांची आत्तापर्यंत पहायला न मिळालेली रंगीत छायाचित्रं. अधिकृत कागदपत्रं, अनेक मुलाखती, प... See more
एक होती माया माया ताडोबाची राणी कशी बनली ? कसा होता तिचा स्वभाव? का जगली नाहीत तिची पिल्लं? का गेले तिच्या हातून माणसांचे बळी? कशी झाली ती रहस्यमयरित्या गायब? या आणि अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न म्हणजे ‘एक होती माया’ हे पुस्तक. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जगप्रसिद्ध वाघीण मायाच्या जन्मापासून ती नाहीशी होण्यापर्यंतचा नाट्यमय प्रवास हे पुस्तक रंजकपणे मांडतं. अनंत सोनवणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मायाच्या जीवनातल्या कधीही न ऐकलेल्या थरारक कहाण्या वाचायला मिळतात. सोबत आहेत नाट्यमय प्रसंगांची आत्तापर्यंत पहायला न मिळालेली रंगीत छायाचित्रं. अधिकृत कागदपत्रं, अनेक मुलाखती, प्रत्यक्षदर्शींचे अनुभव यांच्या आधारावर साकार झालेलं हे पुस्तक वाघांची घनता जास्त असलेल्या जंगलातल्या वाघांच्या संघर्षमय जीवनाचं दर्शन घडवतं. सर्व पानं रंगीत आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्य असलेलं हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरतंय.