बियॉन्ड सेक्स' या कादंबरीला तुम्ही भरपुर प्रतिसाद दिला, त्याबद्दल कृतज्ञ आहेच पण यातील पात्रे म्हणजेच मीरा आणि सागरवर तुम्ही खूप प्रेम केलं... अनेकांनी याचाच पुढचा पार्ट लिहा अशी मागणी केली. अशी पात्रे आपल्या अवतीभोवती कायमच दिसतात मग त्यांनाही वाटतं आपण वाचकांच्या हृदयात पुन्हा एकदा घर करावं... या जगातून जाताना आपल्या चाहत्यांना काहीतरी देऊन जावं. मीरा आणि सागर दोघांनीही गेली पंचवीस वर्षे एकमेकांवर शरीरापलीकडे जाऊन प्रेम केलं पण सेक्स ही शरीराची नैसर्गिक गरज आहे ज्याबद्दल लोक बोलत नाहीत, त्याबद्दल जाणून घेत नाहीत. सौंदर्य आणि फँटसी सगळ्यांच्या मनात असतात पण त्यावर फारसा संवाद साधला जात नाही. त्या�... See more
बियॉन्ड सेक्स' या कादंबरीला तुम्ही भरपुर प्रतिसाद दिला, त्याबद्दल कृतज्ञ आहेच पण यातील पात्रे म्हणजेच मीरा आणि सागरवर तुम्ही खूप प्रेम केलं... अनेकांनी याचाच पुढचा पार्ट लिहा अशी मागणी केली. अशी पात्रे आपल्या अवतीभोवती कायमच दिसतात मग त्यांनाही वाटतं आपण वाचकांच्या हृदयात पुन्हा एकदा घर करावं... या जगातून जाताना आपल्या चाहत्यांना काहीतरी देऊन जावं. मीरा आणि सागर दोघांनीही गेली पंचवीस वर्षे एकमेकांवर शरीरापलीकडे जाऊन प्रेम केलं पण सेक्स ही शरीराची नैसर्गिक गरज आहे ज्याबद्दल लोक बोलत नाहीत, त्याबद्दल जाणून घेत नाहीत. सौंदर्य आणि फँटसी सगळ्यांच्या मनात असतात पण त्यावर फारसा संवाद साधला जात नाही. त्यामुळे त्या दोघांना तुम्हा वाचकांना जे काही द्यावसं वाटत आहे ते या कादंबरीच्या स्वरूपात मी तुम्हाला देत आहे. ही कादंबरी रसरशीत आहे अगदी पाकातल्या पुरीसारखी जी तुम्हाला खूपसारा आनंद देईल. तुमच्याही काही फँटसीज् असतील त्यावरही कदाचीत या पुस्तकात संवाद आला असेल. अनेकांना पडणारे काही प्रश्न असतील, गैरसमज असतील तर त्यावरही या कादंबरीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काहींना सेक्सकडे पाहण्याची दृष्टी नव्याने या कादंबरीत मिळेल. एकूणच ‘अंधारातल्या' प्रश्नांची उत्तरं 'उजेडात आणण्याच्या या प्रयत्नाचं तुम्ही नक्की स्वागत कराल ही खात्री आहे.