प्रदीर्घ काळ विपुल लेखन करून वाचकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारे दिग्गज लेखक 'निवडक', 'वेचक', 'बेस्ट ऑफ' आदी नावांनी त्यांच्या साहित्यातील माणिकमोती संकलित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यास संमती देत असतात. हा खजिना एकत्र मिळाल्याचा महानंद वाचकांना होत असतो. मी प्रदीर्घ काळ व विपुल लेखन नक्कीच केलंय. वाचकांच्या हृदयातील स्थानाविषयी छातीठोकपणे काहीएक विधान करणं मला अप्रशस्त व जोखमीचं वाटतं, पण ज्याअर्थी गेली त्रेचाळीस वर्षं माझं लेखन अविरत चालू आहे व सातत्याने प्रसिद्ध होतंय व माझी पुस्तकं छापायला प्रकाशक उत्सुक असतात त्याअर्थी माझे वाचकांशी कुठेतरी सूर जुळलेत असा निष्कर्ष काढायला जागा आहे. काह�... See more
प्रदीर्घ काळ विपुल लेखन करून वाचकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारे दिग्गज लेखक 'निवडक', 'वेचक', 'बेस्ट ऑफ' आदी नावांनी त्यांच्या साहित्यातील माणिकमोती संकलित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यास संमती देत असतात. हा खजिना एकत्र मिळाल्याचा महानंद वाचकांना होत असतो. मी प्रदीर्घ काळ व विपुल लेखन नक्कीच केलंय. वाचकांच्या हृदयातील स्थानाविषयी छातीठोकपणे काहीएक विधान करणं मला अप्रशस्त व जोखमीचं वाटतं, पण ज्याअर्थी गेली त्रेचाळीस वर्षं माझं लेखन अविरत चालू आहे व सातत्याने प्रसिद्ध होतंय व माझी पुस्तकं छापायला प्रकाशक उत्सुक असतात त्याअर्थी माझे वाचकांशी कुठेतरी सूर जुळलेत असा निष्कर्ष काढायला जागा आहे. काही गोष्टी आपण गृहीत धरून चालतो. उदाहरणार्थ, आईची माया. वाचकांचं प्रेम मी असंच गृहीत धरून चाललोय. तशी मला 'आमचं जीवन शिरीष कणेकरमय झालंय' इथपासून ते 'बंद करा, नाहीतर मारू' इथपर्यंत वाचकांची पत्र येतात.