काही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही. याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का? आयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का? आयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार?
आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज - चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दि... See more
काही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही. याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का? आयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का? आयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार?
आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज - चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत. या सूचना अंगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयुष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते.
‘30 डेज - चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल. तुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची!
या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल : आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!